मुलांवरील हिंसा

आपल्याच कुटुंबात आणि समाजात एखाद्या मुलांला हिंसेला सामोर जाव लागत याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती नाही.  मुलं लहान आहे प्रतिकार करणार नाही, कोणालाही सांगणार नाही असं हिंसा करणाऱ्या व्यक्तीला वाटत का??.  परंतू मुलं हे एक माणूस आहे त्याला भावना आहेत, विचार आहेत, बोलता येते हे हिंसा करणाऱ्यांना माहित नाही का?? एकीकडे आपल्या संस्कृती मध्ये ‘मुलं म्हणजे देवा घरची फुलं’ म्हणतो आणि त्याचं रक्षणं करण्याऐवजी हे हिंसा करणारेच त्याचे भक्षक होतात.

मुलांचे सुरक्षित राहणं अपेक्षित असतांना मुलांचे लैंगिक शोषण ही एक अतिशय गंभीर बाब आहे. याचा परिणाम मुलांच्या इतर अधिकारांवरही होतांना दिसत आहे. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या मुलांच्या अधिकाराच्या जाहीरनाम्यातून मुलांच्या हक्कांच खजिनाच खुला झालाय. त्यानुसार एकीकडे आपण मान्य करायचं की मुलांना जगण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, माहिती गुप्त ठेवण्याचा, खेळण्याचा, शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकासाचा आधिकार, शिक्षणाचा अधिकार, आनंदी, आरामदायी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आणि मुलांच्या या अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवायचं. हे कितपत योग्य आहे??

मुलांवर होणारी हिंसा, त्याचे मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात, त्यासाठी मुलांशी कसा संवाद असावा, मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी तसेच इतर व्यक्तींनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आणि मुलांनी स्वतः सुरक्षित रहाव यासाठी आपण (पालक, शिक्षक, इतर मोठ्यांनी) ही त्यांना काय सांगायला/शिकवायला पाहिजे, मुलांसाठी असलेले कायदे या सर्वाची माहिती या विभागामध्ये मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

कळ्या जपताना..

‘बाल लैंगिक शोषण’ ही एक जागतिक समस्या आहे आणि दुर्दैवाने भारतातही बालकांचे लैंगिक शोषण दिवसेंदिवस वाढत आहे. ‘युनिसेफ’ने २००५ ते ...

मुलांवरील अत्याचाराची तक्रार नोंदविण्यासाठी – प्रथम माहिती अहवाल (FIR)

गुन्हा घडल्याची माहिती / तक्रार जवळच्या पोलिस स्टेशनवर त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांकडे करणे. ही तक्रार लिखित स्वरुपात असणं आवश्यक आहे ...

मुलांवरील हिंसा – हे आपल्याला माहित आहे का?

एका ताज्या सरकारी आकडेवारीनुसार भारतात दर १५ मिनिटाला एका बालकाला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी ...

मुलांना हे माहित असू द्या

शरीर – आपले शरीर हे आपल्या मालकीचे आहे त्याला इजा करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कोण स्पर्श करु शकतं - लहान ...

मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकार

स्पर्शाद्वारे अत्याचार मुलांच्या लैंगिक अवयवाला स्पर्श करणे किंवा हाताळणे. किंवा मुलाला आपल्या लैंगिक अवयवाला स्पर्श करण्यासाठी प्रवृत्त करणे. प्रौढ व्यक्तीने ...

मुले अशा अनुभवाबद्दल का बोलत नाहीत?

सामान्यतः मुले भीती किंवा लाजेपोटी त्यांच्याशी झालेल्या, होत असलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल मोकळेणाने बोलत नाहीत. अत्याचार करणा-याने गुप्तता पाळायला सांगितली म्हणून, ...

अत्याचार झालेल्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणं आणि दीर्घकालीन परिणाम

पालक, शिक्षक, कार्यकर्ते, बालगृहातील कर्मचारी आणि मुलांच्या संदर्भातील इतरही महत्वाच्या व्यक्तींना मुलांवरील शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक अत्याचाराची लक्षणं ओळखता येणं, ...

जर मुलांवर लैंगिक अत्याचार झाला असेल, तर……..

1. मुलावर विश्वास ठेवा लैंगिक अत्याचाराबाबत मुलं सहसा खोटं बोलत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत शहानिशा करण्यासाठी मुलाला अत्याचारी व्यक्तीसमोर नेऊ नका ...

अत्याचार होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

तुमच्यात व तुमच्या बालकामध्ये विश्वासाचे व मोकळ्या संवादाचे वातावरण निर्माण करा. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला /तिला प्रोत्साहन द्या व ...

आपल्या मुलांना जरूर शिकवा/सांगा

लैंगिक अत्याचारांना ठामपणे व जोरात नाही म्हणा. लैंगिक अत्याचाराची शक्यता दिसल्यास तेथून लगेच निघून जा, गरज पडल्यास जोराची शी आली ...

मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार

स्पर्शाद्वारे अत्याचार

  1. मुलांच्या लैंगिक अवयवाला स्पर्श करणे किंवा हाताळणे. किंवा मुलाला आपल्या लैंगिक अवयवाला स्पर्श करण्यासाठी प्रवृत्त करणे.
  2. प्रौढ व्यक्तीने मुलाशी मुख, गुदा किंवा लैंगिक संभोग करणे, किंवा मुलाला तसे करण्यास प्रवृत्त करणे.
  3. मुलांच्या गुदद्वारात, योनीमार्गात बोटे अथवा वस्तू घालणे.
  4. मुलांचे हस्तमैथून करणे किंवा मुलाकडून हस्तमैथुन करून घेणे.

स्पर्शाशिवायचे अत्याचार

  1. प्रौढ व्यक्तीने स्वतःच्या लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे, किंवा मुलाला तसे करायला लावणे.
  2. प्रौढ व्यक्तीने मुलाला उद्देशून सूचक लैंगिक हावभाव करणे किंवा लैंगिक भाषा वापरणे.
  3. प्रौढ व्यक्तीने मुलाला अश्लील साहित्य, चित्र दाखवणे, इंटरनेटद्वारे त्या प्रकारचे साहित्य-संदेश पाठवणे, किंवा मुलाला तशी कृती
  4. करायला लावणे. मुलाचे त्या अवस्थेतले फोटो घेणे, किंवा छायाचित्रण करणे.
  5. लैंगिक कृतीच्या बदल्यात पैसे, भेटवस्तू अथवा इतर बक्षिसांचे आमिष दाखविणे.

सर्वसाधारण अशी समजूत असते की, परका, अनोळखी माणूस, मनःस्वास्थ्य गमावलेला माणूस मुलांवर लैंगिक अत्याचारासारखं अमानुष कृत्य करतो. दुर्दैवानं वस्तुस्थिती याच्या उलट आहे.

आपल्या मुलांना जरूर शिकवा/सांगा

  • लैंगिक अत्याचारांना ठामपणे व जोरात नाही म्हणा.
  • लैंगिक अत्याचाराची शक्यता दिसल्यास तेथून लगेच निघून जा, गरज पडल्यास जोराची शी आली आहे, असा बहाणा करा.
  • आरडाओरडा करा. काहीही करून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करा.
  • स्पर्श न करता अथवा स्पर्श करून लैंगिक अत्याचार झाल्यास मोठया व विश्वासातील व्यक्तींना लगेच सांगा. मदत मिळेपर्यंत सांगत राहा.
  • लैंगिक अत्याचार करणाऱ्यासमोर, तुमच्यावर अत्याचार झालाय हे तुम्ही कोणाला तरी सांगणार आहात असं बोलू/सांगू नका. तिथून निसटल्यावर विश्वासातल्या व्यक्तीला जरूर सांगा.(संदर्भ- बाल लैंगिक अत्याचार विरोधी अभियान –आलोचना)

अत्याचार होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

  • तुमच्यात व तुमच्या बालकामध्ये विश्वासाचे व मोकळ्या संवादाचे वातावरण निर्माण करा.
  • स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला /तिला प्रोत्साहन द्या व तिच्या / त्याच्या नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
  • बालकाशी शरीररचनेबाबत चर्चा करून त्याच्या /तिच्या सर्व प्रश्नांची योग्य माहिती करून घेऊन उत्तरे द्या.
  • आपल्या बालकाला हे जरूर शिकवा – आपल्या शरीरातील काही अवयवांना आपण खाजगी अवयव म्हणतो. ते आतल्या कपड्यांनी झाकलेले असतात. तुमच्या शरीराच्या स्वच्छतेकरता फक्त आई-वडील आणि वैद्यकीय तपासणीकरता आई-वडिलांच्या समोर डॉक्टर तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करू शकतात. पण त्यांच्याशिवाय इतर कोणी असे करत असेल, तर ते बरोबर नाही.
  • बालकांच्या बदलेल्या वागण्याकडे लक्ष द्या.

(संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली’ – विद्या आपटे)