कौटुंबिक हिंसा

आपल्याच कुटुंबात जेंव्हा एखाद्या महिलेला हिंसेचा सामना करावा लागतो तेंव्हा त्याला कौटुंबिक हिंसा असे म्हणतात. रक्ताच्या नात्यातील व्यक्ती, कायदेशीर दत्तकत्व, विवाह यासारख्या नात्यामध्ये असलेल्या व्यक्ती म्हणजेच पती, सासू-सासरे, आई-वडील, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ इत्यादी कोणीही घरातील स्त्रीवर केलेले हिंसक कृत्य म्हणजे कौटुंबिक हिंसा. ही हिंसा शारीरिक,  लैंगिक,  भावनिक आणि आर्थिक अशा कोणत्याही प्रकारची असू शकते.

आपण या सेक्शन मध्ये कौटुंबिक हिंसा, त्याचे परिणाम, हिंसेपासून महिलांची सुरक्षितता, कौटुंबिक हिंसा विरोधी कायदा, हुंडा आणि कायदा, लिव्ह इन रिलेशनशिप आणि हिंसा, परदेशस्थित महिलांची सुरक्षितता अशा विविध अंगांनी या विषयाला जाणून घेणार आहोत. कौटुंबिक हिंसा आणि कायाद्यासंबंधीची सर्व माहिती या सेक्शनमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

 

कौटुंबिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

आपल्या समाजात आणि स्वतःच्या कुटुंबातच स्त्रियांवर हिंसा होताना आपण बघतो, ऐकतो आणि अनुभवतोही. या हिंसेची सुरुवातच स्त्रीच्या जन्मापासूनच होतांना दिसते ...

कौटुंबिक हिंसेचे चक्र

स्त्रीवर होणारी हिंसा ही एखाद दुसरी घटना आहे असे म्हणून तिला कमी लेखणे चुकीचे ठरेल. कुटुंबातील हिंसेचे गांभीर्य समजून येण्यासाठी ...

कौटुंबिक हिंसाचार कायदा – कौटुंबिक हिंसाचाराला हद्दपार करूया

कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण २००५ हा कायदा २६ अक्टोंबर २००६ रोजी प्रत्यक्षात अंमलात आला. परंतु आजही या कायद्याबद्दल उलटसुलट चर्चा ...

कौटुंबिक हिंसेमध्ये संरक्षण अधिकाऱ्याची भूमिका

पीडित व्यक्तीला कौटुंबिक हिंसामुक्त जीवन सन्मानाने जगण्यासाठी सबळ करणे हे संरक्षण अधिका-याचे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच त्यांची पीडबल्यू डीव्हीए (कौटुंबिक ...

हुंडा – हुंड्यासाठी छळ, विविध स्वीरूपातली हुंड्याची मागणी, हुंडाबळी

आपल्या समाजात जात, धर्म यांनुसार खूप वेगवेगळ्या रूढी-परंपरा आहेत. त्यानुसार हुंडा घेण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा जरी औद्यौगीकीकरणामध्ये आणि ...

लिव्ह इन नात्याबद्दल आणि त्यातून होणारी हिंसा

भारतात लग्नव्यवस्था आज ही भक्कमपणे पाय रोवून आहे. मुलगी-मुलगा वयात आले की त्यांच्या लग्नाबद्दल प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष चर्चा सुरु होते. मुलीला ...

एन आर आय लग्नातील हिंसा आणि स्त्रियांनी काय काळजी घ्यावी

परदेशात जायला मिळणे ह्याची क्रेझ खूप असते. मग फिरण्याच्या निमित्ताने असो व कामासाठी. नोकरी तिथे मिळाली वा लग्न करून परदेशस्थ ...

STOP Domestic Violence | Ek Lambi Saans | A Short Video in Hindi

Help to prevent domestic violence. Verbal abuse can be as traumatizing as physical abuse. Hitting or abusing somebody weaker is a natural tendency and it can be easily changed.