हिंसेचे स्त्रियांवर होणारे परिणाम

पुरुषाप्रधान संस्कृतीने स्त्रियांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला आहे. त्यामुळेच स्त्रियांवर हिंसा होताना दिसते. या हिंसेतून स्त्रियांवर खूप वाईट परिणाम होताना दिसतात. या परिणामांमध्ये फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक,  लैंगिक आणि इतरही परिणाम आहेत.

शारीरिक परिणाम

व्यक्तीवर होणा-या शारीरिक हिंसेचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात. हाड मोडणे, भाजणे, डोक्याला इजा, अॅसिड टाकून भाजणे, चाकूचे वार अंतर्गत जखमा ...

मानसिक परिणाम

व्यक्तीवर झालेल्या हिंसेचे जसे शारीरिक परिणाम दिसतात. तसेच मानसिक परिणामही होतात. ते व्यक्तीच्या बोलण्या-वागण्यात झालेल्या बदलामुळे समजतात.  हे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून ...

लैंगिक परिणाम

व्यक्तीवर झालेल्या लैंगिक हिंसेमुळे त्यांच्या लैंगिकतेवर ही परिणाम होतात. ते पुढीलप्रमाणे दिसून येतात. वेदना देणारा संभोंग लैंगिक आजाराचे संक्रमण जननेंद्रिय, ...

इतर परिणाम

व्यक्तीवर/ स्त्रियांवर होणा-या हिंसेचे परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर होताना दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे आहेत. स्त्रियांना जीवन जगणे, हिडणे, फिरणे अवघड ...

हिंसेचा परिणाम बायांच्या संपूर्ण आयुष्यात खूप खोलवर झालेला दिसून येतो. ज्यातून बऱ्याच वेळा स्त्रिया हिंसेच्या परिणामामधून बाहेर पडू शकत नाहीत आणि त्यांना स्वतःचा जीव गमावावा लागतो.

म्हणूनच हिंसेचा सामना करणाऱ्या स्त्रियांनी आपल्यावर होणा-या हिंसेबद्दल बोलणं खूप महत्वाचं आहे. अशा व्यक्तीने/स्त्रीने हिंसेला विरोध करण्यासाठी विश्वासातील व्यक्तीशी बोलून त्या व्यक्तीची, सामाजिक संस्थांची, कायद्याची मदत घेऊन हिंसेला विरोध केला पाहिजे. इतर व्यक्तींनीही स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेला विरोध करण्यासाठी मदत करणे फार महत्त्वाची आहे.

त्यासाठीच हिंसा सहन करावी लागणाऱ्या व्यक्तीला/स्त्रीला आणि मदत करणारी व्यक्ती या सर्वाना मदत होणारी ही वेबसाईट आहे.

(संदर्भ – स्त्रियांवरील हिंसा –सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लेखन – ऑड्री फर्नांडिस प्रकाशक – तथापि, वर्ष २००१)