व्यक्तीवर झालेल्या हिंसेचे जसे शारीरिक परिणाम दिसतात. तसेच मानसिक परिणामही होतात. ते व्यक्तीच्या बोलण्या-वागण्यात झालेल्या बदलामुळे समजतात. हे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात.
- आत्मविश्वास कमी होणे, न राहणे.
- निर्णय न घेता येणे.
- स्त्रियांचे मानसिक खच्चीकरण खूप होते.
- असुरक्षित वाटणे.
- कोणाबद्दल विश्वास न वाटणे.
- नैराश्य, भीती, अपराधीपणा वाटणे.
- खूप हायपर होतात.
- सेल्फ बिलिफ सिस्टिम कोलमडते.
- स्वनियंत्रण कमी
- मुड-स्विंग होतात
- संशयाच्या नजरेतून बघत राहणे.
- कमीपणाची भावना वाढते.
- आत्म्हत्येचे विचार.
- नकारात्मकता वाढते.
- अंगात येणे
हिंसेमुळे झालेल्या मानसिक परिणामासाठी लवकरात-लवकर समुपदेशक किंवा सायकॅट्रीस्टची जरूर मदत घ्या. आपल्यावर होणा-या हिंसेला प्रतिकार करा व सुरक्षित रहा.