मानसिक/भावनिक

मानसिक/भावनिक हिंसेमध्ये पुढील प्रकार दिसून येतात. यामध्ये व्यक्तीला वाईट व हीन वागणूक,  व्यक्तीला जास्तीत जास्त परावलंबी व दुय्यम असल्याची जाणीव करून देणे.

  • सतत टीका करणे
  • चुका काढणे
  • अपमान करणे
  • स्वतःला, तिला किवा जवळच्या व्यक्तींना इजा करण्याची धमकी देणे
  • आवडते कपडे, दागिने, वस्तूचे नुकसान करणे, मोडतोड करणे
  • वारंवार शाब्दिक मार, अबोला धरणे
  • माहेरच्या व्यक्तींबद्दल वाईट बोलणे
  • सतत संशय घेणे, अविश्वास दाखवणे
  • घरातून निघून जाण्यासाठी सांगणे.

व इतर अनेक प्रकार