सुरक्षा नियोजन

स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार न करण्याच्या शिकवणुकीमुळे मुलींना त्यांच्या आयुष्यात अनंत प्रकारचे त्रास सहन करावे लागतात. मारहाण होणे, संशय घेतला जाणे हा आपल्यावर होणारा अन्याय आहे. याची जाणीवसुद्धा स्त्रियांमध्ये आजपर्यंत फारशी निर्माण केली गेलेली नाही.

घराबाहेर आणि घरातही स्त्रीवर अत्याचार होतो, तेव्हा त्याबाबत कोणाशी बोलायचे, अन्यायाला वाचा फोडायची. याचे पुरेसे मार्गदर्शन स्त्रियांना कोणी करत नाही. एखाद्या स्त्रीने तक्रार केलीच तर समाजाचे दडपण तिला गप्प राहाण्यास भाग पाडते. सामाजिक दडपणांमुळे विधवा, परित्यक्ता, अविवाहित आणि विवाहित स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो.

कुटुंबाअंतर्गत होणा-या हिंसेमध्ये कित्येकदा स्त्रियांना गंभीर दुखापत होते, अकारण मृत्युमुखी पडावे लागते. कौटुंबिक हिंसेचा हा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. जात, वंश, धर्म, वय, वर्ग, देश, भाषा या कशाच्याही मर्यादा या प्रश्नाला नाहीत.

कौटुंबिक हिंसेची वारंवारिता, हिंसेचा प्रकार, हिंसक व्यक्ती व हिंसाग्रस्त व्यक्तींचे स्वभाव, त्यांचे सामाजिक व आर्थिक स्थान या सर्वांवर सुरक्षा नियोजन अवलंबून असते. एका विशिष्ट पद्धतीने वागल्यास हिंसा जास्त किंवा कमी होईल, असे हमखास मापदंड घालून देणे अशक्य आहे.

कौटुंबिक हिंसेविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्या व स्थानिक महिला मंडळ सदस्य स्वतःच्या विवेकबुद्धीने स्त्रीच्या परिस्थितीचा विचार करून तिला सुरक्षा नियोजन करण्यास मदत करू शकतील. प्रत्यक्ष नियोजन करत असतनाच हिंसापीडित स्त्रीला तिचा आत्मविश्वास मिळवून देणे, तिच्यामधील असुरक्षितता दूर करणे गरजेचे आहे.

लग्नानंतर माहेरी भावाच्या संसारात मुलींना स्थान नसल्यामुळे मुलींनी सासरीच राहायचे असे त्यांच्या मनावर सतत बिंबवले जाते. पण जिवाला धोका असेल, किंवा माणुसकीची वागणूक मिळत नसेल, तर समाजनिंदेला घाबरून नवऱ्याच्या घरात हिंसा सहन करत का जगायचे? याबद्दल स्त्रियांना विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. केवळ जीव वाचवून राहणे यापलीकडे जाऊन सन्मानाने जगण्यासाठीचे विविध पर्याय स्त्रीपुढे मांडत राहिले पाहिजे. तिच्या सन्मानाने जगण्याच्या धडपडीला या सुरक्षा नियोजनाची जोड महत्त्वाची ठरेल.

या मनामनातून बांधू या एक वाट जाणारी…..

आपल्या आसपासची, ओळखीची, जिवाभावाची किंवा अगदी अनोळखी, कधीही न पाहिलेली आठ लाख माणसं दर वर्षी या जगाला रामराम म्हणतायत. युद्धं, ...

कागदपत्रांची जुळवणी

महत्त्वाची कागदपत्रे हिंसाचार होण्याची चाहूल लागताच पुढील सर्व कागदपत्रे अथवा त्याच्या अधिकृत प्रती तुमच्याकडे आहेत, याची खात्री करून घ्या. लग्नपत्रिका ...

आईचे व मुलांचे सुरक्षा नियोजन

लहान मुलांना मोठ्यांच्या भांडणामध्ये घेणे चुकीचे आहे. पण आपला जीव धोक्यात येणार असेल तर त्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची व ...

व्यसनाधीन व्यक्तीपासून घ्यायची काळजी

व्यसनी व्यक्तींमुळे (विशेषतः दारू पिणाऱ्या नवऱ्यापासून) कुटुंबातील इतर सदस्यांना मानसिक, आर्थिक, तसेच शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. समाजात अपमानित व्हावे ...

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून सुरक्षा नियोजन

कौटुंबिक हिंसेव्यतिरिक्त समाजात सार्वजनिक ठिकाणी मुली व स्त्रियांच्या होणा-या लैंगिक छळाबाबत काही सूचना पुढील टप्प्यात दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी लैंगिक ...

आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःचे संरक्षण

स्त्रीच्या मनातील आत्महत्येचा विचार धोकादायक परिस्थितीत स्त्रीची इच्छाशक्ती शाबूत असते तोवर ती विरोध करते, परंतु सतत होणाऱ्या मारहाणीनंतर तिच्यामध्ये परिस्थितीशी ...