निर्धार समानतेचा

शंभराव्या वर्षात पदार्पण केलेल्या आय्एल्एस् विधी महाविद्यालयाने स्विसएड व युरोपियन युनियन यांच्या समवेत ‘महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील लिंगाधारित हिंसा आणि भेदभाव विशेषतः कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाह’ या विषयावर ‘निर्धार समानतेचा’ प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी आय्एल्एस् विधी महाविद्यालयात पार पडला.

Justice Devendra Upadhyaya on Domestic Violence and Child Marriage

२ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यातील आय् एल् एस् विधी महाविद्यालय येथे निर्धार समानतेचा “महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील लिंगाधारीत हिंसा आणि भेदभाव विशेषतः कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाह.” या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायलायचे सरन्यायाधीश मा. देवेंद्रकुमार उपाध्याय उपस्थित होते, या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

Dr Prashant Narnawre Commissionaire WCD, Pune.

२ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यातील आय् एल् एस् विधी महाविद्यालय येथे निर्धार समानतेचा ” महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील लिंगाधारीत हिंसा आणि भेदभाव विशेषतः कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाह.” या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास आयुक्त, महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य चे श्री. प्रशांत नारनवरे उपस्थित होते, या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

‘Mukti’ – A video prepared by ILS Cultural Cell



विवाहसंबंधांमधील अनैच्छिक शरीरसंबंध : एक समाजमान्य बलात्कार?

‘बस, आता एवढंच ऐकणं बाकी होतं !’, असं म्हणत छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलेल्या वैवाहिक बलात्कार (marital rape) बद्दलच्या एका निर्णयावर अभिनेत्री तापसी पन्नू ने काहीशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. २३ ऑगस्ट २०२१ रोजी, “दिलीप पांडे वि. छत्तीसगड राज्य” या खटल्या चा निकाल देताना कोर्टाने असे स्पष्ट केले की पतीने त्याच्या १८ वर्षांवरील कायदेशीर बायकोशी इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे हा बलात्कार होत नाही. या नंतर, कोर्टाच्या या निकाला संदर्भात समाज माध्यमे तसेच प्रसार माध्यमांमध्ये बरीच आगपाखड झाली. या पूर्वी सुद्धा वैवाहिक बलात्काराबाबत सर्वोच्च न्यायालय व देशातील विविध न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले आहेत. परंतु छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सदर लेखातून आपण या निकाला विषयी आणि वैवाहिक बलात्कारा विषयी आपल्या देशात असलेल्या कायदेशीर भूमिकेबाबत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

Read more…


बालविवाहा विरुद्ध राधाचा यशस्वी लढा

राधा, वय वर्ष १६, भारताचं भविष्य कसं आशावादी आहे हे सांगणारी एक आत्मविश्वासू मुलगी. या वयात आवश्यक असलेलं खेळणं-बागडणं, शाळेत शिक्षण सुद्धा जोमात सुरू होतं. त्याबरोबरंच इतर सामाजिक कामांचीसुद्धा ओढ लागली. त्यातूनच स्वतःच्या बुद्धी आणि परिश्रमांच्या जोरावर, तिने कैलाश सत्यर्थींच्या ‘बाल पंचायतीचे’ प्रमुख पदाला गवसणी घातली.

Read more…