स्त्रिया आणि लैंगिक हिंसा

भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रियांना एकीकडे देवी म्हणून त्यांना महिमामंडीत करण्याचा प्रयत्न दिसतो तर त्याच वेळी त्यांची तुलना पशु सोबत केली जाते. पितृसत्तेच्या चष्म्यातून बाईपणाचे गोळीबंद आदर्श उभे केले जातात आणि ‘चुकणाऱ्या’ स्त्रीला शिक्षा देण्याचा अधिकार पितृसत्ता आपल्या हाती ठेवते. आमच्याकडे स्त्रियांना उच्च दर्जा आहे म्हणत म्हणत मुलींना जन्माला येण्यापासूनच रोखले जाते.

लहान मुलीपासून ते ८० वर्षांची वृद्ध स्त्री या समाजात असुरक्षित असते ते या मुळेच. रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, खाजगी जागा ते अगदी स्वतःचे घर असे कुठलेच ठिकाण नाही जिथे स्त्रिया सुरक्षित आहेत. कौटुंबिक हिंसेच्या, लैंगिक हिंसेच्या असंख्य घटना आपण रोज ऐकतो, पाहतो, अनुभवतो. स्त्रीचे वागणे, बोलणे, दिसणे, चालणे, इतकेच काय तिचे असणेही ही पुरुषी नजर आणि सत्ता नियंत्रित करू इच्छिते. रात्री ८ ला मित्रासोबत बाहेर का फिरते आहेस हे एखादा ऐरागैरा पुरुष, जो एकप्रकारे तिला आपली जबाबदारीच समजतो, तिला सहज विचारतो. ‘उत्तर’ दिले म्हणून सगळे मिळून तिला निर्घृण धडा शिकवण्याचा निर्णय घेतात. ज्याचा परिणाम पाहून सगळे जग हादरून जाते ते याच देशात.

मुली आणि महिलांवरील लैंगिक हिंसेच्या घटनांना नियंत्रण, बदला, सत्ता, मालकी, बाजार, जात, धर्म आणि वंश भेद असे अनेक पैलू आहेत. आपल्या वेबसाइटवरील ‘स्त्रिया आणि लैंगिक हिंसा’ या विभागात या सर्व पैलूंना आपण स्पर्श करणार आहोत. शिवाय कायदा काय म्हणतो, लैंगिक हिंसा ज्या स्त्रीला सहन करावी लागत असेल तिला कोणती मदत कुठे मिळू शकते, आपण तिला कशी मदत मिळवून देऊ शकतो अशा निरनिराळ्या अंगांनी या विषयाला या विभागात आपण भिडणार आहोत.

लैंगिक हिंसेबाबत आपल्याला माहित आहे का?

भारतात स्त्रियांविरोधात होणाऱ्या सामान्य गुन्ह्यांपैकी बलात्कार हा चौथा मोठा गुन्हा आहे. (सेफसिटी) जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार जगभरात तीन ...

बलात्कार म्हणजे काय?

२०१३ मध्ये भारतात ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे, यानुसार दुसऱ्या स्त्रीच्या योनीमध्येच नाही तर तोंड, गुदद्वार, मूत्रमार्ग किंवा ...

छेडछाड म्हणजे काय?

मुली/स्त्रिया यांना शाळेत, कॉलेज, नोकरीला/कामधंदा किंवा कुठेही जाताना काही मुलं/पुरुष रस्ता अडवतात, अश्लील जोक करणे, शिट्ट्या, डोळा मारणे, पाठलाग करणे, ...

पोलिसांची मदत कशी घ्याल? पोलिस प्रथम खबर अहवाल म्हणजे काय?

प्रथम खबर अहवाल म्हणजेच F.I.R. हा अहवाल मणजे घडलेल्या गुन्हयाबद्दल पोलिसांना दिलेल्या तपशीलवार माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार ...

बलात्कार ऐतिहासिक घटना – १. मथुरा प्रकरण १९७२

मथुरा बलात्कार प्रकरण हे १९७२ रोजी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देसाई गंज पोलिस ठाण्यात घडले, ज्यामध्ये मथुरा ही १६ वर्षाची ...

बलात्कार ऐतिहासिक घटना – २. भंवरीदेवी बलात्कार प्रकरण १९९२

राजस्थानमध्ये शासकीय कार्यक्रमातील आरोग्याचे काम करणाऱ्या भंवरीदेवी ‘साथीन’ म्हणून काम करत होत्या. त्यांनी बालविवाहासारख्या सामाजिक प्रश्नावर काम करण्याचं ठरविलं आणि ...

बलात्कार ऐतिहासिक घटना – ३. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण २०१२

ज्योतीसिंग ही दिल्ली मध्ये फिजिओथेरपीचं शिक्षण घेणारी २३ वर्षीय तरुणी (‘निर्भया’). देशाची भावी डॉक्टर तिच्यावर डिसेंबर २०१२ मध्ये संध्याकाळच्या वेळी ...

विवाहाअंतर्गत बलात्कार – कायदा हवाच, पण केव्हा?

अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ...

कायदा तुमच्या हाती – लैंगिक अत्याचारांविरोधात कायदा-

अत्याचारांबाबत न बोलता ते सहन करीत राहिल्यास ते जास्त प्रमाणात आणि जास्त क्रूरतेने होऊ शकतात परंतु त्याविरोधात बोलल्यास, मदत घेतल्यास ...

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ कायदा

लैंगिक छळ म्हणजे..? लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतींचा समावेश होतो. शारीरिक, तोंडी ...