पोटगी बाबतचा मा. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

कौटुंबिक खटल्यांमध्ये जाबदेणार कडून पोटगी / निर्वाह भत्ता मिळवण्यासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत, जसे की –  कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ चे कलम २०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १२५ , हिंदू विवाह अधिनियम १९५५ चे कलम २४, २५, २६,  हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६ चे कलम १८ -२८, विशेष विवाह अधिनियम १९५४ चे कलम ३६, ३७, इत्यादी.

अनेक वेळा एकाहून अधिक कायदेशीर तरतुदीं अंतर्गत पोटगी मिळवण्यासाठी विविध न्यायालयांमध्ये अर्ज केले जातात. पोटगीची प्रक्रिया पूर्ण करण्या करिता अर्जदार व जाबदेणार यांचे कडून न्यायालयामार्फत वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जाते. न्यायालयीन प्रक्रियेतील या कायदेशीर औपचारिकते मुळे अर्जदारांचा गोंधळ उडतो व पोटगी मिळवणे अधिक क्लिष्ट होऊन जाते.

या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2020 मध्ये दिलेला “रजनीश वि. नेहा ” हा निकाल अतिशय महत्वाचा ठरतो. या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीचा दावा चालविणे बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामुळे पोटगी मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेतील अनेक अडचणी दूर झाल्या असून ही प्रक्रिया आता अधिक सहज, सोपी व नेमकी झाली आहे.

रजनीश वि. नेहा या खटल्याची पार्श्वभूमी – 

सदरचा खटला पत्नीने तिला व तीच्या अल्पवयीन मुलाला, पती कडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५ अंतर्गत निर्वाह भत्ता मिळवण्या करिता कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. प्रस्तुत खटल्यामध्ये कौटुंबिक न्यायालयाने पत्नी करिता दर महा १५,००० रुपये व मुला करिता १०,००० रुपये पोटगी म्हणून मंजूर केले होते. सदरच्या निर्णयाला आव्हान देण्याकरिता पती ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची याचिका नाकारली आणि कौटुंबिक न्यायालयाचा वरील निर्णय कायम ठेवला. तरी, पती ने पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की, त्याची आर्थिक परिस्थिती सबळ नसल्यामुळे तो कौटुंबिक न्यायालयाने ठरवुन दिल्या प्रमाणे पत्नीला निर्वाह भत्ता / पोटगी देऊ शकत नाही. सदर याचिके मध्ये पत्नी ने तिचे पती विरुद्ध आरोप केला होता की, पत्नीला निर्वाह भत्ता/ पोटगी देण्यापासून सुटका होण्याकरिता पती न्यायालयापासून त्याच्या आर्थिक परिस्थिती व गुंतवणुकी संबंधित माहिती लपवत आहे.

सदर याचिके मध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयचा निर्णय कायम ठेवला आणि पतीने पत्नीला प्रलंबित निर्वाह भत्ता द्यावा असा आदेश दिला. तसेच पोटगीच्या दाव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी पाहता, मा. सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना देखील निर्देशित केल्या.

मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पोटगी संदर्भातल्या सर्व दाव्यांमध्ये दोन्ही पक्षांना न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक असेल. या प्रतिज्ञापत्रात दोन्ही पक्षांच्या वैयक्तिक माहिती सोबतच त्यांच्या उत्पन्ना विषयीची माहिती, त्यांच्या मुलांची माहिती, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय माहिती तसेच त्यांची मालमत्ता आणि देण्यांविषयी ची माहिती द्यावी लागणार आहे.

सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना खालील प्रमाणे आहे:

मालमत्ता व कायदेशीर देण्यां संदर्भातील प्रतिज्ञापत्र (बिगर शेती चे उत्तपन्न असणाऱ्यांसाठी) 

मी _______ श्री. __________ यांचा/यांची मुलगा/मुलगी वय ______ वर्षे प्रस्तुत प्रतिज्ञापत्राद्वारे सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो/करते ते खालीलप्रमाणे:

. वैयक्तिक माहिती

१. नाव:

२. वय / लिंग:

३. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता:

४. अर्जदार सध्या रहात असलेल्या घराचा पत्ता:

सासरी/आई-वडिलांच्या घरी/स्वतंत्र निवासस्थानी

अर्जदार सध्या राहत असलेले घर/निवासस्थानचे मालकी बाबतचा  तपशील:

५. विवाह तारीख

६. विभक्त झाल्याची तारीख

७. अर्जदाराच्या सर्वसाधारण मासिक खर्चाचा तपशील (घरभाडे, घरगुती खर्च, वैद्यकीय खर्च, दैनंदिन प्रवासाचा खर्च ई.)

. कायदेशीर कार्यवाही पोटगी बाबतचा तपशील:

१. अर्जदार व जाबदेणार यांचेमध्ये पोटगी किंवा मुलांच्या पालनपोषणा संदर्भात चालू अथवा निकाली निघालेल्या कायदेशीर कार्यवाही चा तपशील.

२. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायदा २००५, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, हिंदू विवाह अधिनियम १९५५ किंवा हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६, इत्यादी पैकी कोणत्याही कायद्या अंतर्गत न्यायालयाकडून पोटगी प्रदान करण्यात आली आहे का? तसे असल्यास सदरच्या मान्य करण्यात आलेल्या पोटगीच्या रकमेचा तपशिल.

३. तसे असल्यास, सदरच्या तपशिला संदर्भात न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडणे.

४. पूर्वीच्या कार्यवाहीतील पोटगी बाबतच्या न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी झाली आहे का? झाली नसल्यास थकित पोटगीच्या रकमे बाबतचा तपशील देणे.

५. पोटगी बाबत काही ऐच्छिक योगदान दिले गेले आहे का / भविष्यात देण्यात येऊ शकते का? तसे असल्यास त्या बाबतचा तपशील देणे.

. अवलंबून असलेल्या कौटुंबिक सदस्यांची माहिती

१. अवलंबून असलेल्या कौटुंबिक सदस्यांचा तपशील:

अ) अवलंबून असणाऱ्या सदस्यांशी अर्जदाराचे काय नाते आहे

ब) अवलंबून असणाऱ्या सदस्यांचे वय व लिंग

२. अवलंबून असणाऱ्या सदस्यांचे स्वतंत्र उत्पन्नाचे स्त्रोत जसे की व्याज उत्पन्न, मालमत्ता, निवृत्ती वेतन व अशा कोणत्याही उत्पन्ना वरील कर दायित्व आणि इतर संबंधित तपशीलांचा खुलासा करावा.

३. अवलंबून असणाऱ्या व्यक्तीवर केलेला / झालेला खर्च (अंदाजे)

. प्रतिज्ञापत्र करणाऱ्याचे त्याच्यावर / तिच्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांचे वैद्यकीय तपशील

१. दोन्ही पक्षांपैकी कोणी, किंवा त्यांचे मूल/मुलं, कोणत्याही शारीरिक/मानसिक अपंगत्वाने अथवा गंभीर आजाराने ग्रस्त आहेत का? तसे असल्यास वैद्यकीय नोंदींचा तपशील द्यावा.

२. अवलंबून असणाऱ्या सदस्याला गंभीर अपंगत्व आहे का ज्यासाठी सततच्या वैद्यकीय खर्चाची आवश्यकता भासते? तसे असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र सादर करावे तसेच सदरच्या वैदकीय उपचारासाठी अंदाजे लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा तपशिल द्यावा.

३. दोन्ही पक्षांपैकी कोणी, अथवा त्यांचे मूल/मुलं अथवा कोणताही अवलंबून असणारा सदस्य दुर्धर आजाराने ग्रस्त आहे का ज्यासाठी महागडे व नियमित वैद्यकीय खर्च करावे लागतात? तसे असल्यास रुग्णालयात दाखल केल्याचे आणि आत्तापर्यंतच्या वैद्यकीय खर्चाचे तपशील द्यावे.

. पक्षकारांच्या मुलां बाबतचे तपशील

१. विद्यमान विवाह / वैवाहिक संबंध / मागील वैवाहिक संबंधातून असलेल्या मुलांची संख्या.

२. मुलांचे नाव आणि वय

३. मुलांचा ताबा असलेल्या पालकाचे तपशील.

४. अवलंबून असलेल्या मुलांच्या पालनपोषणाचा खर्च –

अ) अन्न-पाणी, कपडा-लत्ता, वैद्यकीय खर्च

ब) शैक्षणिक खर्च व इतर सामान्य खर्चाचे तपशील

क) कोणताही अतिरिक्त शैक्षणिक, व्यावसायिक खर्च किंवा व्यावसायिक / शैक्षणिक कोर्सचा खर्च, विशिष्ट प्रशिक्षण किंवा कौशल्य विकास प्रशिक्षणाचा खर्च याचा तपशील

ड) मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी घेतलेले कर्ज, तारण, शुल्क, हफ्ते (भरलेले किंवा देय रक्कम) बाबतचा तपशिल.

५. या शैक्षणिक खर्चासाठी पक्षकाराने ऐच्छिक योगदान दिले आहे का ? तसे असल्यास त्याचा तपशील द्यावा. तसेच अतिरिक्त योगदानाची गरज असल्यास त्या बाबतचे अंदाजपत्रक देण्यात यावे.

६. मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी त्रयस्त इसम अथवा संस्थांकडून काही आर्थिक सहाय्य पुरवले जाते का?

. प्रतिज्ञापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्ना बाबतचा तपशील

१. नियोकत्याचे नाव

२. पदनाम/हुद्दा

३. मासिक उत्पन्न

४. सरकारी नोकरीत असल्यास चालू वेतनाचा दाखला किंवा चालू महिन्याचे वेतनपत्र (पे स्लीप) किंवा नियोक्त्याकडून वेतन थेट बँक खात्यावर जमा झाल्याचे प्रमाण.

५. खासगी क्षेत्रात कार्यरत असल्यास ज्या हुद्द्यावर काम करत आहात त्या बाबतचा  व त्या कामी मिळणाऱ्या एकूण मासिक वेतनाचा नियोक्त्याचा दाखला सादर करावा. तसेच संबंधीत कालावधीचा फॉर्म नं. १६ देखील सादर करावा.

६.  नियमित पगाराशिवाय नियोक्त्याकडून चालू कार्यकाळात मिळणारे इतर लाभ, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, महागाई भत्ता ई. याचे तपशील.

७. आयकर भरण्यास पत्र आहात काय? असल्यास खालील वर्षांचे आयकर विवरण पत्र भरल्याच्या पावत्या जमा करणे –

अ) विवाहापूर्वीचे एक वर्ष

ब) विभक्त होण्या पूर्वीचे एक वर्ष

क) पोटगी चा अर्ज दाखल केला ते वर्ष

८. इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न – जसे की, भाडे, व्याज, समभाग (शेअर्स), लाभांश (डीविडेंड), भांडवली नफा, बँकेतल्या ठेवी, पोस्टातील ठेवी, म्युच्युअल फंड, रोखे, ऋणपत्रे, इतर व्यवसाय / शेतीतून मिळणारे उत्पन्न व टिडीएस् पात्र उत्पन्ना वरील कराचा खुलासा करावा.

९. मागील तीन वर्षांच्या कालावधी साठीचे सर्व बँक खात्यांचे विवरणपत्र (बँक स्टेटमेंट) सादर करावे.

. प्रतिज्ञापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेचा (स्थावर जंगमतपशील

१. स्व – कष्टार्जित मालमत्ता.

२. विवाहानंतर दोन्ही पक्षांच्या संयुक्त मालकीची मालमत्ता.

३. वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा

४. पक्षकारांच्या संयुक्त मालकीची इतर मालमत्ता – बँक खाती, गुंतवणूक, बँकेतल्या ठेवी, म्युच्युअल फंड, रोखे, समभाग, ऋणपत्रे ई. त्यांचे मूल्य आणि ताब्याचे तपशील.

५. स्थावर मालमत्तेच्या ताब्याचे तपशील. त्यातून भाडे मिळत असल्यास त्याचे तपशील.

६. प्रतिज्ञापत्र करणार्‍या व्यक्तीने दिलेल्या/घेतलेल्या कर्जाचे तपशील.

७. दोन्ही पक्षकारांना विवाह दरम्यान अथवा विवाह नंतर प्राप्त झालेल्या दाग – दागिन्यांचा थोडक्यात तपशिल

८. वैवाहिक जीवना दरम्यान अर्जदार यांचे मालकीच्या मालमत्ते बाबत तबदिलीचा दस्त किंवा व्यवहार झाला असल्यास त्याबाबतचा तपशिल. सदरची विक्री किंवा व्यवहारा मागची कारणे संक्षिप्तरीत्या द्यावीत.

. प्रतिज्ञापत्र करणार यांची देणीत्याचे तपशील :

१. प्रतिज्ञापत्र करणार यांचे विरुद्ध थकीत असणाऱ्या कर्ज, तारण, गहाण किवा इतर थकबाकी असल्यास त्याचा तपशील.

२. देय मासिक हफ्त्यांचा तपशिल.

३. कर्ज घेतल्याची तारीख व उद्देश.

४. प्रतिज्ञापत्र दाखल केले तारखेपर्यंत कर्जाद्वारे प्राप्त झालेल्या वास्तविक रक्कमेचा व कर्जफेडीसाठी भरलेल्या रक्कमेचा तपशिल.

५. प्रतिज्ञापत्र करणार यांच्या सध्याच्या देण्यां संबंधीत इतर महत्वपूर्ण माहिती

 . स्वयंरोजगार असणारी व्यक्ती / व्यावसायिक व्यक्ती / उद्योजक

१. व्यवसाय / उद्योग / कामाच्या स्वरूपाचे संक्षिप्त वर्णन.

२. व्यवसाय / उद्योग / स्वयं रोजगार खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे:

  1. एकमेव व्यक्तिगत मालकी
  2. भागीदारी
  3. एल्. एल्.पी.
  4. कंपनी अथवा व्यावसायिक संघटना
  5. हिंदू अविभक्त कुटुंब
  6. संयुक्त कौटुंबिक व्यवसाय
  7. इतर स्वरूपाचा

व्यवसाय / उद्योग / भागीदारी – उद्योगांमध्ये अर्जदाराचा हिस्सा नमूद करावा. भागीदारी असल्यास अर्जदाराचा नफा व तोट्यात असलेला हिस्सा नमूद करावा.

३. व्यवसाय / स्वयंरोजगार/ भागीदारी उद्योगातून मिळणारे निव्वळ उत्पन्न नमूद करावे.

४. व्यवसाय / स्वयंरोजगार/ भागीदारी उद्योगाशी संबंधित देणी नमूद करावीत.

५. व्यवसाय / उद्योग / स्वयंरोजगार, कंपनीच्या स्वरूपात असल्यास शेवटच्या लेखापरीक्षित ताळेबंदानुसार नफा / तोट्याचे संक्षिप्त तपशील द्यावे.

६. व्यवसाय भागीदारीत असल्यास त्याचा शेवटचा आयकर विवरण पत्र भरल्याचा तपशिल द्यावा.

७. स्वयंरोजगार असल्यास शेवटचा आयकर विवरण पत्र भरल्याचा तपशिल द्यावा.

  1. प्रतिज्ञापत्र करणाऱ्याच्या जोडीदाराच्या उत्त्पन्न, मालमत्ता व कायदेशीर देणी या बाबतची माहिती / तपशिल

१. जोडीदाराची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता.

२. जोडीदार कमावतो / कमावते का? कमावत असल्यास त्याच्या / तिच्या व्यवसाय/रोजगार व उत्पन्नाचा तपशील.

३. जोडीदार राहत असलेले निवासस्थान त्याच्या स्वतःच्या मालकीचे / भाड्याचे / नियोक्त्याने उपलब्ध करून दिलेले आहे?

४. जोडीदाराच्या मालमत्तेचे व कायदेशीर देण्यांचे तपशील व त्यासाठी ची पूरक कागदपत्रे.

. अर्जदार किंवा त्याचा / तिचा जोडीदार अनिवासी भारतीय, परदेशी नागरिक किंवा ओव्हर सीस इंडियन असल्यास त्यांचे तपशील:

१. अर्जदार किंवा तिचा / त्याचा जोडीदार कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरुपात परदेशात रहात असल्यास त्यांचे नागरिकत्व, राष्ट्रीयत्व व सध्या राहत असलेल्या निवासस्थानाचे तपशील.

२. अर्जदार किंवा तिचा / त्याचा जोडीदार यांच्या सध्याच्या कामाचे स्वरूप व परकीय चलनाच्या स्वरूपातील चालू उत्पन्नाबाबतचा तपशिल व त्याबाबत तिच्या किंव त्याच्या परदेशी नियोक्त्याकडून अथवा संस्थेकडून तिला / त्याला मिळालेले नियुक्ती पत्रक अथवा संबंधीत बँकेचा उतारा व इतर कागदोपत्री नोंदी.

३. परदेशी अधिकार क्षेत्रातील अर्जदार किंवा तिच्या / त्याच्या जोडीदार यांचे घरगुती व इतर खर्चाचे तपशिल.

४. अधिकार क्षेत्रातील अर्जदार किंवा तिच्या / त्याच्या जोडीदार यांचे कर दायित्वा चे तपशील.

५. अर्जदार किंवा तिच्या / त्याच्या जोडीदार यांना भारतीय किंवा परदेशी स्त्रोतांपासून मिळणाऱ्या इतर उत्तपान्नाचे तपशिल.

६. मुलं व जोडीदाराच्या पालनपोषण, वैद्यकीय, शैक्षणिक व इतर गरजांसाठी केलेल्या योगदानाचा किंवा खर्चाचा तपशील.

७. वरील कोणत्याही शीर्षकात अथवा परिशिष्ठात समाविष्ट न केलेले इतर खर्च / देणी किंवा अवलंबून असणाऱ्या भारतातील अथवा परदेशातील कौटुंबिक सदस्यांप्रती असलेली देणी.

घोषणा पत्र

१.मी घोषित करतो/करते की मी, सर्व स्त्रोतांतून मिळणाऱ्या माझ्या उत्पन्न, खर्च, मालमत्ता व देण्यांविषयी संपूर्ण व अचूक माहितीचा खुलासा केला आहे. पुढे मी जाहीर करतो / करते की प्रस्तुत प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्यांखेरीज माझी इतर कोणतीही मालमत्ता, उत्पन्न, खर्च आणि देणी नाहीत.

२.माझ्या नोकरी/उद्योग, मालमत्ता, उत्पन्न, खर्च, यांच्या बाबतीत किंवा प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या इतर कोणत्याही माहिती बाबत महत्वपूर्ण बदल झाल्यास त्याबद्दल या मे. न्यायालयाला विनाविलंब सूचित करण्याची जबाबदारी मी अंगीकारतो/अंगीकारते.

३. मी जाणतो/जाणते की प्रस्तुत प्रतिज्ञापत्रात नमूद केले गेलेले कोणतेही विधान खोटे असल्याचे आढळल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. याव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम १९९, १९१ आणि १९३ अन्वये हा गुन्हा असून त्यासाठी ७ वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम २०९ अन्वये सदरच्या गुन्ह्यासाठी २ वर्षा पर्यंत चा कारावास आणि दंड होऊ शकतो. भारतीय दंड संहिता १८६०, मधील कलम १९१, १९३, १९९, २०९ मी वाचले आहेत आणि ते मला समजले आहेत.

_____________________

प्रतिज्ञापत्र करणार

 

व्हेरीफीकेशन / सत्यापन

मी आज ………………………… रोजी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो/करते की वरील प्रतिज्ञापत्रात नमूद सर्व मजकूर माझ्या वैयक्तिक व प्रामाणिक माहिती नुसार खरा व बरोबर आहे. वरील कोणताही मजकूर खोटा नसून त्यात कोणतीही महत्वपूर्ण माहिती लपवलेली नाही. माझ्या पती/पत्नी च्या मालमत्ता, उत्पन्न व खर्चाविषयीचा वर नमूद प्रतिज्ञापत्रातील मजकूर दफ्तरी नोंदींच्या आधारे खरी मानण्यात येणाऱ्या माहितीवर आधारित आहे. तसेच, मी पुढे प्रमाणित करतो की, प्रस्तुत प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेली कागदपत्रे मूळ कागदपत्रांच्याच प्रती आहेत.

सत्यापन करणाऱ्याची सही 

कृषी उत्त्पन्न असणाऱ्या अवधारकांसाठी प्रतिज्ञापत्राचे तपशील

१. मालकीची असलेली एकूण ग्रामीण जमीन किंवा सदर जमिनीतील विशिष्ठ हिस्सा

२. मालकी सिद्ध करण्यासाठी जमाबंदी / फेरफार उतारे

३. पक्षाकराच्या मालकीच्या जमिनीचे स्थान (पत्ता) / ठिकाण

४. जमिनीचे स्वरूप – कोरडवाहू जमीन किंवा बागायती जमीन

५. सदरची जमीन शेतजमीन आहे की बिगर शेत जमीन

६. शेतीचे स्वरूप – शेती / फलोत्पादन

७. वर्षभरात घेतलेल्या पिकांचे स्वरूप व तपशील

८. ग्रामीण भागातील जमीन शेतीयोग्य नसल्यास सदर जमीन उद्योग/व्यवसायासाठी वापरली जाते काय किंवा भाडेतत्त्वावर दिली आहे काय ?

९. मागील ३ वर्षात सदर जमिनीतून मिळालेले उत्पन्न

१०. भाडेतत्त्वावर अथवा वाट्याने अन्य जमीन घेतली आहे काय?

११. अ) स्वमालकीचे पशुधन जसे की गाई, म्हशी, बकरी – बोकड, कुकुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, वराह पालन, इत्यादी असल्यास त्याची संख्या व त्यातून मिळणारे उत्पन्न.

ब) दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, व इतर तत्सम व्यवसाय असल्यास त्याचा व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशिल.

१२. सदरची जमीन तारण ठेवून कर्ज घेतले असल्यास त्याबाबतचा तपशील.

१३. उत्पन्नाचे इतर काही स्त्रोत.

१४. देणी असल्यास त्याचे तपशील.

१५. इतर संबंधित माहिती.

१.मी घोषित करतो/करते की मी, सर्व स्त्रोतांतून मिळणाऱ्या माझ्या उत्पन्न, खर्च, मालमत्ता व देण्यांविषयी संपूर्ण व अचूक माहितीचा खुलासा केला आहे. पुढे मी जाहीर करतो / करते की प्रस्तुत प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्यांखेरीज माझी इतर कोणतीही मालमत्ता, उत्पन्न, खर्च आणि देणी नाहीत.

२.माझ्या नोकरी/उद्योग, मालमत्ता, उत्पन्न, खर्च, यांच्या बाबतीत किंवा प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या इतर कोणत्याही माहिती बाबत महत्वपूर्ण बदल झाल्यास त्याबद्दल या मे. न्यायालयाला विनाविलंब सूचित करण्याची जबाबदारी मी अंगीकारतो/अंगीकारते.

३. मी जाणतो/जाणते की प्रस्तुत प्रतिज्ञापत्रात नमूद केले गेलेले कोणतेही विधान खोटे असल्याचे आढळल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. याव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम १९९, १९१ आणि १९३ अन्वये हा गुन्हा असून त्यासाठी ७ वर्षांचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम २०९ अन्वये सदरच्या गुन्ह्यासाठी २ वर्षा पर्यंत चा कारावास आणि दंड होऊ शकतो. भारतीय दंड संहिता १८६०, मधील कलम १९१, १९३, १९९, २०९ मी वाचले आहेत आणि ते मला समजले आहेत.

_____________________

प्रतिज्ञापत्र करणार

 

व्हेरीफीकेशन / सत्यापन

मी आज ………………………… रोजी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो/करते की वरील प्रतिज्ञापत्रात नमूद सर्व मजकूर माझ्या वैयक्तिक व प्रामाणिक माहिती नुसार खरा व बरोबर आहे. वरील कोणताही मजकूर खोटा नसून त्यात कोणतीही महत्वपूर्ण माहिती लपवलेली नाही. माझ्या पती/पत्नी च्या मालमत्ता, उत्पन्न व खर्चाविषयीचा वर नमूद प्रतिज्ञापत्रातील मजकूर दफ्तरी नोंदींच्या आधारे खरी मानण्यात येणाऱ्या माहितीवर आधारित आहे. तसेच, मी पुढे प्रमाणित करतो की, प्रस्तुत प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेली कागदपत्रे मूळ कागदपत्रांच्याच प्रती आहेत.

 

सत्यापन करणाऱ्याची सही