कौटुंबिक हिंसेमध्ये संरक्षण अधिकाऱ्याची भूमिका

पीडित व्यक्तीला कौटुंबिक हिंसामुक्त जीवन सन्मानाने जगण्यासाठी सबळ करणे हे संरक्षण अधिका-याचे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच त्यांची पीडबल्यू डीव्हीए (कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा २००५) खाली नेमणूक केली आहे.

 संरक्षण अधिका-याने पीडितेस खालील बाबतीत सहाय्य करणे आवश्यक आहे.

  • पीडितेला पोलीस, आसरा घरे, वैद्यकीय सुविधा, लीगल एड (विधी प्राधिकरण) अॅथॉरिटी कडून नि:शुल्क वकीलांचे साहाय्य मिळावे. कायद्याच्या सर्व टप्प्यांवर जिथे आवश्यकता आहे तिथे (कायदा कार्यपद्धतीचे वर वर्णन केल्याप्रमाणे) न्यायालयात जाण्यासाठीचे साहाय्य मिळावे ह्यासाठी प्रयत्न करणे.
  • सर्व उपाय योजून हिंसा थांबवणे आणि हिंसेला आळा घालणे यासाठी प्रयत्न करणे.
  • संरक्षण अधिकारी न्यायदंडाधिका-यांच्या नियंत्रणाखाली असून त्यांच्या आदेशानुप्रमाणे पीडबल्यूडीव्हीए (कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा २००५) च्या नियम १० अन्वये काम करणे हे त्यांचे कर्तव्य असते. उदा.-
  • जर कोर्टास आदेश देण्यासाठी स्पष्टीकरण हवे असेल तर कोर्टाच्या आदेशप्रमाणे सामायिक घरास भेट देणे आणि प्राथमिक चौकशी करणे.
  • कोर्टाने निर्देशित केल्यानुसार योग्य चौकशीनंतर जाब देणा-याच्या आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर करणे.
  • कोर्टाच्या आदेशानुसार पीडितेची वैयक्तिक स्वरुपाची ठेव – भेटवस्तू आणि दागिने यांसह तिला परत मिळवून देणे.
  • कोर्टाच्या आदेशानुसार सामायिक घराची मालकी मिळवून देणे.
  • कोर्टाच्या निर्देशानुसार पीडितेस् तिच्या मुलांचा ताबा परत मिळवून देणे आणि संरक्षण अधिका-याच्या देखरेखीखाली त्यांना भेटण्याचे हक्क मिळवून देणे.
  • पीडब्ल्यूडीव्हीएच्या अंतर्गत संमत केलेल्या आदेशांची दंडाधीकार-याच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यास कोर्टास साहाय्य करणे.
  • कुटुंबात स्त्रीवर हिंसा करण्यासाठी/करताना वापरलेले हत्यार जप्त करण्यासाठी न्यायालयीन आदेशानुसार पोलिसांचे साहाय्य घेणे.
  • दंडाधिकारीसुद्धा संरक्षण अधिका-यावर कायद्याच्या तरतुदीच्या प्रभावी उपाययोजनासाठी अथवा अंमलबजावणीसाठी काही कामे सोपवू शकतात.

संरक्षण अधिकाऱ्यांची यादी (शक्यतो जिल्हानिहाय, नसेल तर कुठे मिळू शकेल त्याची लिंक – पत्ते)

जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अंतर्गत WAV (वॉव) हा भाग शासन आणि TISS तर्फे चालविला जातो तेथे फोन करून विचारू शकतो. तसेच १८१ टोल फ्री क्रमांकाला फोन करून विचारू शकतो.

(संदर्भ- प्रवाससक्षमतेकडे, लेखन – डॉ.शिरीष साठे, डॉ. कौस्तुभ जोग, डॉ. जया सागडे, प्रसन्ना इनवल्ली    प्रकाशन – स्त्री अभ्यास केंद्र, लॉ कॉलेज)