मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकार

स्पर्शाद्वारे अत्याचार

  1. मुलांच्या लैंगिक अवयवाला स्पर्श करणे किंवा हाताळणे. किंवा मुलाला आपल्या लैंगिक अवयवाला स्पर्श करण्यासाठी प्रवृत्त करणे.
  2. प्रौढ व्यक्तीने मुलाशी मुख, गुदा किंवा लैंगिक संभोग करणे, किंवा मुलाला तसे करण्यास प्रवृत्त करणे.
  3. मुलांच्या गुदद्वारात, योनीमार्गात बोटे अथवा वस्तू घालणे.
  4. मुलांचे हस्तमैथून करणे किंवा मुलाकडून हस्तमैथुन करून घेणे.

स्पर्शाशिवायचे अत्याचार

  1. प्रौढ व्यक्तीने स्वतःच्या लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे, किंवा मुलाला तसे करायला लावणे.
  2. प्रौढ व्यक्तीने मुलाला उद्देशून सूचक लैंगिक हावभाव करणे किंवा लैंगिक भाषा वापरणे.
  3. प्रौढ व्यक्तीने मुलाला अश्लील साहित्य, चित्र दाखवणे, इंटरनेटद्वारे त्या प्रकारचे साहित्य-संदेश पाठवणे, किंवा मुलाला तशी कृती
  4. करायला लावणे. मुलाचे त्या अवस्थेतले फोटो घेणे, किंवा छायाचित्रण करणे.
  5. लैंगिक कृतीच्या बदल्यात पैसे, भेटवस्तू अथवा इतर बक्षिसांचे आमिष दाखविणे.

सर्वसाधारण अशी समजूत असते की, परका, अनोळखी माणूस, मनःस्वास्थ्य गमावलेला माणूस मुलांवर लैंगिक अत्याचारासारखं अमानुष कृत्य करतो. दुर्दैवानं वस्तुस्थिती याच्या उलट आहे.

संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली’ – विद्या आपटे