मुले अशा अनुभवाबद्दल का बोलत नाहीत?

सामान्यतः मुले भीती किंवा लाजेपोटी त्यांच्याशी झालेल्या, होत असलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल मोकळेणाने बोलत नाहीत. अत्याचार करणा-याने गुप्तता पाळायला सांगितली म्हणून, तर कधी कुटुंबच बोलण्यापासून थांबवतं म्हणून.

    •  जे झालं त्याबद्दल बोलायचं नाही, लपवायचं. याचा अर्थ आपलंच चुकलं असणार असं वाटून स्वतःला दोषी समजणं.
    • घरात, संस्थेत किंवा भोवतालच्या वातावरणात मोकळा संवाद नसणं.
    •  कोणीही विश्वास ठेवणार नाही, ओरडतील, मारतील ही भीती असते.
    • आपण सर्वांचे नावडते होऊ, ही भीती.
    • अत्याचार करणा-याबरोबरचं असलेलं नातंही तुटेल ही धास्ती.
    • अत्याचार करणा-याची भीती / धमक्यांमुळे घाबरणं.
    •  कुणाशी विश्वासानं बोलावं हे न कळणं.
    • काय घडलं ते कसं सांगावं हे समजत नाही. नेमके शब्द माहीत नसतात
    • संस्था / घराच्या इभ्रतीला / प्रतिष्ठेला मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा अधिक महत्त्व
    • प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल याची भीती

(संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली’ – विद्या आपटे)