आपल्या मुलांना जरूर शिकवा/सांगा

  • लैंगिक अत्याचारांना ठामपणे व जोरात नाही म्हणा.
  • लैंगिक अत्याचाराची शक्यता दिसल्यास तेथून लगेच निघून जा, गरज पडल्यास जोराची शी आली आहे, असा बहाणा करा.
  • आरडाओरडा करा. काहीही करून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करा.
  • स्पर्श न करता अथवा स्पर्श करून लैंगिक अत्याचार झाल्यास मोठया व विश्वासातील व्यक्तींना लगेच सांगा. मदत मिळेपर्यंत सांगत राहा.
  • लैंगिक अत्याचार करणाऱ्यासमोर, तुमच्यावर अत्याचार झालाय हे तुम्ही कोणाला तरी सांगणार आहात असं बोलू/सांगू नका. तिथून निसटल्यावर विश्वासातल्या व्यक्तीला जरूर सांगा.

    (संदर्भ- बाल लैंगिक अत्याचार विरोधी अभियान –आलोचना)