मुलांचे हक्क

जगण्याचा हक्कविकासाचा हक्कसहभागाचा हक्कसुरक्षिततेचा हक्क
  • जन्माला येण्याचा, राष्ट्रीयत्वाचा, सकस आहार, जरुरीप्रमाणे कपडे आणि निवारा.
  • समाधानकारक आणि आवश्यक राहणीमान
  • उत्कृष्ट आरोग्याचा दर्जा आणि परिणामकारक आरोग्य सेवा
  • तो किंवा ती अपंग असेल, तर अशा मुलांसाठी विशेष सेवा, ज्याद्वारे त्यांचा आत्मसन्मान प्रतिष्टा जोपासली जाईल, ती स्वावलंबी होतील आणि त्यांचा समाजात कार्यक्षम वावर राहील.
  • सामाजिक सुरक्षितता आणि बाल सेवा-सुविधा
  • मोफत प्राथमिक शिक्षण
  • माध्यमिक शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची उपलब्धता
  • त्याच्या किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास, उपजत गुण / प्रतिभा आणि मानसिक, शारीरिक कार्यक्षमता पूर्ण करेल असे शिक्षण
  • शिक्षण अशा भावनेचं जे समजावेल शांतता/सोशिकता आणि समानता
  • खेळ आणि मनोरंजन तसेच सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी
  • संधी… त्याच्या किंवा तिच्या संस्कृतीचा आनंद लुटण्याची, त्याच्या किंवा तिच्या धर्माचा अभिमान मिरविण्याची.
  • मुलांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सर्व बाबींमध्ये त्याला /तिला आपलं म्हणणं, दृष्टिकोन व्यक्त करण्याचा गंभीरपणे विचारात घेतलं जाण्याचा हक्क
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
  • विचार सद्सद्विवेक बुद्धी आणि धर्माचं स्वातंत्र्य
  • एकत्र येण्याचं आणि शांतता सभा घेण्याचं स्वातंत्र्य
  • विविध स्रोतांकडून माहिती मिळविण्याचं स्वातंत्र्य.
  • गंभीर परिस्थितीत- उदा. जातीय दंगल, युद्धासारखा संघर्ष किंवा जेव्हा मुलं आपल्या कुटुंबापासून किंवा घरापासून दूर असतात.
  • जेव्हा तो किंवा ती कायद्याच्या कचाट्यात सापडतात
  • शोषणाच्या स्थितीत. उदा. बालमजुरी, अमली पदार्थाचा गैरवापर, लैंगिक शोषण किंवा निंदा, विक्री, अपहरण
  • इतर कोणत्याही प्रकारचा भेदभाव.

(संदर्भ – मुलांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली – विद्या आपटे)

  • आश्रमशाळा मुलांसाठी लिंक

https://sjsa.maharashtra.gov.in/mr/ashram-shala-mr

  • अनुसुचीत जाती निवासी शाळा

https://sjsa.maharashtra.gov.in/mr/residential-schools-mr

  • वसतिगृहे – Government Hostels, Government Aided Hostels

https://sjsa.maharashtra.gov.in/mr/hostels-mr

संदर्भ – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – महाराष्ट्र शासन https://sjsa.maharashtra.gov.in/mr