ज्या व्यक्ती मुलांचा लैंगिक छळ करतात त्यांची मानसिक स्थिती चांगली नसते / त्या मानसिक रुग्ण असतात.

“आपले अनुभव आठवून बघा की जरा! कोण होते ते?”

नाही. मुलांचा होणारा लैंगिक छळ हे सुद्धा सत्ता संबंधांचं एक उदाहरण आहे. मोठी माणसं आपल्या ताकदीचा, अधिकारांचा वापर मुलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी करतात. मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि आकडेवारी पहिली तर असे अत्याचार अनेकदा घरात, ओळखीच्या व्यक्तीकडून होताना दिसतात. अत्याचार करणारी माणसं सर्व सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्तरातील आसतात. शिकलेली तशीच अशिक्षितही असतात. चांगल्या मानसिक स्थितीत असलेली व्यक्ती असं करत नाहीत हे लपविण्यासाठी त्या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नाही असं पसरविलं/सांगितलं जातं.