कौटुंबिक हिंसा, मारहाण पूर्वीच्या बायकांवर व्हायची. आजकाल असं काही होत नाही.

“काय म्हणता?”

पूर्वीचा काय आणि आत्ताचा काय, हिंसा सर्वच काळात होताना दिसून येते. हिंसेच्या स्वरुपात/प्रकारात काळानुसार थोडे-फार बदल झाले आहेत. परंतु हिंसा थांबलेली नाही. फक्त पूर्वी स्त्रिया ती सहन करत होत्या. तर आत्ता स्त्रिया, त्याही काहीच, हिंसेविरोधी बोलू लागल्या आहेत. शिक्षणामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, त्यांना आपले अधिकार कळत आहेत. त्यातून काहीजणी खंबीरपणे हिंसेला विरोध करत आहेत हे खरं आहे. आपल्या समाजात जाणूनबुजून असे गैरसमज पसरविले जातात की, कौटुंबिक हिंसा, मारहाण पूर्वीच्या स्त्रियांवर होते. तर आजकाल असं काही होत नाही.