अत्याचार होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

  • तुमच्यात व तुमच्या बालकामध्ये विश्वासाचे व मोकळ्या संवादाचे वातावरण निर्माण करा.
  • स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला /तिला प्रोत्साहन द्या व तिच्या / त्याच्या नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
  • बालकाशी शरीररचनेबाबत चर्चा करून त्याच्या /तिच्या सर्व प्रश्नांची योग्य माहिती करून घेऊन उत्तरे द्या.
  • आपल्या बालकाला हे जरूर शिकवा – आपल्या शरीरातील काही अवयवांना आपण खाजगी अवयव म्हणतो. ते आतल्या कपड्यांनी झाकलेले असतात. तुमच्या शरीराच्या स्वच्छतेकरता फक्त आई-वडील आणि वैद्यकीय तपासणीकरता आई-वडिलांच्या समोर डॉक्टर तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करू शकतात. पण त्यांच्याशिवाय इतर कोणी असे करत असेल, तर ते बरोबर नाही.
  • बालकांच्या बदलेल्या वागण्याकडे लक्ष द्या.

(संदर्भ – ‘मुलांचे लैंगिक शोषण सुरक्षितता त्यांची – जबाबदारी आपली’ – विद्या आपटे)