वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचा बलात्कार होऊ शकत नाही.

हा आपला गैरसमज आहे.

असं म्हणनंच चुकीचं आहे. आपल्या समाजात वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा/नकारात्मक आहे. या स्त्रियांकडे नेहमी एक उपभोगाची वस्तू म्हणूनच पुरुष बघत असतात. धंदाच करते ना मग तिला आपली संमती देण्याचा, न देण्याचा काहीच अधिकार नाही असं समजलं जातं. खरं तर संमती नसलेले कुठलेही लैंगिक संबंध ही जबरदस्तीच असते. संमती न देणाऱ्या व्यक्तीचा आणि तिच्या व्यवसायाचा काही एक संबंध नाही. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीची इच्छा नसताना कोणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवत असेल तर तो बलात्कारच आहे आणि कायद्याने त्यालाही शिक्षा आहे.