स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात / पुरुष स्त्रियांपेक्षा अधिक ताकदवान असतात.

कोण म्हणतंय? साफ खोटं हाय, लिहून घ्या.

वास्तवात महिला पुरुषांपेक्षा अनेक अर्थाने अधिक कणखर असतात. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की महिला पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात. जगण्याच्या स्पर्धेत स्त्री अर्भक पुरुष अर्भाकापेक्षा अधिक उजवे असते. आकडेवारी सांगते की मुली मुलांपेक्षा अधिक कणखर असतात आणि म्हणूनच मुलग्यांपेक्षा मुलींचा मृत्यूदर कमी असतो. शिवाय अनेक गंभीर आजारांशी मुकाबला करण्याची ताकद पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असते असंही समजलं जातं. आजही जर १०० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींवर नजर टाकली तर त्या यादीत महिलाच अधिक आढळून येतील. मग स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमकुवत कसे म्हणणार?

आपल्या इथे पुरुषप्रधान समाजरचनेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान आणि पुरुषांना उच्च स्थान दिले जाते. स्त्रियांवर अनेक बंधनं घातली जातात. बऱ्याच वेळा मुलींना / स्त्रियांना  पौष्टिक अन्न मिळत नाही. पुरुषांनपेक्षा स्त्रिया घरातील, घराबाहेरील, शेतातील कामे जास्त करत असतात. या सर्वांचा परिणाम मुली स्त्रिया कुपोषित आणि कमकुवत होतात. गरज आहे हे चित्र बदलण्याची, नाही का?