फक्त स्त्रियाच स्त्रीवादी असतात

आमच्या ८ मार्चचा कार्यक्रम नाही का बगीतला तुम्ही. कित्येक जण झेंडे घेऊन चालतेत मोर्चात.

नाही. स्त्रीवाद फक्त स्त्रियांसाठी नाही. स्त्री पुरुष सामानतेच्या तत्वामध्ये विश्वास असणारे आणि उक्तीला तशी कृतीची जोड देणारे अनेक पुरुषही स्त्रीवादी आहेत. स्त्रीवाद सच्चा माणूसपणाकडे वाटचाल करण्याचे आवाहन करतो, स्त्रियांच्या राज्याकडे नाही. स्त्रीवाद एक विचारसरणी, एक जगण्याची अशी पद्धत आहे ज्यात सर्व प्रकारच्या विषम रूढी परंपरा, व्यवहार आणि समजुती नाकारल्या जातात, ज्यामुळे बाईला निव्वळ बाई आहे म्हणून दुय्यम स्थान दिलं जातं.