जिथे गरिबी आहे तिथेच हिंसा दिसते

मोठ-मोठ्या सोसायट्यात / बंगल्यात या एकडाव

नाही. हिंसेचा सामना हर एक वर्ग, जाती, धर्म, वंश यातील महिलांना करावा लागतो. स्त्रियांवरील हिंसेला जशी पितृसत्ता कारणीभूत आहे त्याच प्रमाणे बायांना आर्थिक अधिकार नसणे हेही एक महत्वाचे कारण आहे. संपत्तीच्या अधिकारापासून बाईला जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते आणि त्यातून तिच्यावर अधिकार गाजवला जातो. महाराष्ट्र आणि भारतातून लाखो मुली जन्मण्यापूर्वीच गायब झाल्या हे हिंसेचे भयंकर रूप आहे. मुलग्याच्या हव्व्यासातून आणि डॉक्टरांच्या नफेखोरीतून गर्भलिंग निदान आणि मग गर्भपात ही हिंसा गरीब कुटुंबात क्वचितच होताना दिसते. आपल्या राज्यातील साखर, शिक्षण आणि दुध सम्राट निर्माण करणारे तथाकथित विकसित जिल्हे मुलींच्या संख्येत पिछाडीवर आहेत.