कौटुंबिक हिंसा ही खूपच कमी स्त्रियांवर होते.

“कमी म्हंजे किती?”

नाही. हे धादांत खोटं आहे. भारतात लाखो महिला सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या हिंसेचा आणि भेदभावाचा सामना करतात. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एन सी आर बी) आत्ताच्या आकडेवारीनुसार भारतात दर ३ मिनिटांनी महिला विरोधी अपराधाची नोंद होते. नोंद न होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल न बोललेलंच बरं. दर ६ तासांनी एक विवाहित स्त्री भाजून किंवा मारहाणीमुळे किंवा बुडून मरते. एक आकडेवारी सांगते की तब्बल 26% महिलांनी आपल्या जोडीदाराकडून कधी न कधी शारीरिक हिंसेचा अनुभव घेतला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल