स्त्रीवादी स्त्रियांचा लग्नव्यवस्थेवर विश्वास नाही.

त्यांचा ‘मानवी’ नाते संबंधांवर, एकेमकांना पूरक असण्यावर विश्वास आहे.  

स्त्रीवादी स्त्रियांचा, पुरुषांचा आणि भिन्नलिंगी व्यक्तींचाही परस्पर प्रेम, आदर आणि एकमेकांसाठी पूरक असणे यावर विश्वास आहे. जोडीदाराची आवश्यकता ज्या ज्या स्त्री-पुरुषांना वाटते त्यांना आपला जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असावं, जात-धर्म-लिंग अशा भिंती त्या निवडीच्या आड येऊ नयेत आणि एकदा निवड केल्यानंतरही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असावं असंही त्यांना वाटतं. आपल्या इथल्या लग्नाच्या पारंपारिक व्यवस्थेत अशा कुठल्याच स्वातंत्र्याचा विचार तर नाहीच परंतु अशा स्वातंत्र्याची आस असणाऱ्या व्यक्तींना दंड करण्याची व्यवस्था मात्र आहे. ही व्यवस्था बाईसाठी एक न्याय आणि पुरुषांसाठी दुसरा न्याय लावते. बाईचा विचारच इथे केला जात नाही. आपली लग्न व्यवस्था वर उल्लेख केलेल्या सर्व प्रकारच्या विषमतांना जन्म देते, वाढवते आणि पसरवते. त्यामुळे अशा व्यवस्था किंवा संस्थांना सुधारणे, बदलणे आपलं कामच आहे.