मुली/स्त्रिया कमी कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात.

असं असत तर ४ वर्षाच्या मुलींवर बलात्कार झाले नसते.

हे खोटं आहे. मुली/स्त्रिया यांच्यावर बलात्कार झाला तर त्यांनाच दोष दिला जातो. त्या छोटे कपडे घालतात, रात्रीच्या बाहेर पडतात, अनोळखी लोकांबरोबर बोलतात, हसतात अशी कारणं देतात. कपडे घालण्याचाच मुद्दा असता तर लहान मुलीपासून ते साडी नेसणाऱ्या , बुरखा घालणाऱ्या, अपंग असलेल्या, म्हाताऱ्या स्त्रियांवरही बलात्कार होताना दिसतात. गरज आहे ती पुरुषांचा, एकूणच समाजाचा मुली आणि स्त्रिया यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची.

स्त्रीही एक माणूस आहे. तिचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे.