बाईलाच वाटत असतं की तीला मुलगाच व्हावा.

उलटा चोर कोतवाल को डाटे!

असं मूळीच नाही. मुलग्याची आस हे पुरुषप्रधान संस्कृतीचं मूल्य आहे. वंशाला दिवा हवां, अग्नी द्यायला मुलगाच हवा या पुरुषी समजुती आहेत. मुख्य म्हणजे संपत्ती इतर कुणाला न जाता आपल्याच घरात राहावी म्हणून मुलाग्यासाठीची तडफड असते. बाई गरोदर राहिली की अनेकदा सासरच्या मंडळींच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे स्त्रीच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी. मग चालू होते हे तपासण्याची धडपड. त्यासाठी अशी तपासणी करणारे डॉक्टर शोधून तपासणी करतात आणि मुलींचा गर्भ असेल तर गर्भपात केले जातात. जरी असं करणं कायद्यानं गुन्हा असलं तरी! मुलीचा जन्म झाला म्हणून त्या स्त्रीचं आणि जन्मलेल्या मुलीचं तोंडही बघत नाहीत, बोलत नाहीत, तिला माहेरीच राहायला सांगतात किवा सोडून देतात असेही अनेक महाभाग आपल्या समाजात आहेत. हे असं केवळ पुरुषच करतात असं नाही तर अनेकदा बायांनाही आपल्या घरात मुलगाच यावा असं वाटत असतं. बाईला किमत न देणाऱ्या आपल्या समाजातील या विषम मूल्यांचा भार वाहण्याचे काम बहुदा बाईलाच दिलं जातं.

नका करू गर्भलिंगनिदान – मुलगी मुलगा एकसमान