स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा तिरस्कार

नाही. हे खरं न्हाय. पुरुष काय शत्रू न्हाईत.   

स्त्रीवाद म्हणजे खरं तर स्त्री-पुरुष समान मानणारी एक विचारसरणी आहे. स्त्रियांना सर्व बाबतीत समान वागणूक, समान संधी मिळावी; स्त्रीला आदराने, माणूस म्हणून वागवले जावे, असा विचार करणारा प्रवाह म्हणजेच स्त्रीवाद. स्त्रीवादाचे आव्हान व्यवस्थेतील विषमतांना आहे, पुरुषांना नाही. पुरुष स्त्रीवादाचे शत्रू नाहीत.