बाईच बाईची शत्रू असते

नसते गं माझी माय. बाईचे खरे शत्रू म्हंजे ह्यो पुरुषीपणा आन आपल्या रूढी परंपरा.


‘मुलगा होत नाही म्हणून अगर हुंडा कमी दिला म्हणून सासू सुनेचा छळ करताना दिसते. परंतु तो मुलगा ज्यासाठी हवा असतो, तो त्या सासूच्या आईचा वंश चालवण्यासाठी नाही, तर सासऱ्याच्या माहित नसलेल्या पूर्वजाचा वंश चालवण्यासाठी हवा असतो. पितृसत्ताक व्यवस्थेत बाईच्या वाट्याला नेहमी पुरुषाच्याच मागे चालण्याची वेळ येते. मग तो कधी बाप असतो, तर कधी नवरा तर कधी मुलगा. स्वतःची कसलीही ओळख, अस्तित्व  किंवा स्वतःचे कसले कर्तृत्व दाखवता येत नाही. जन्मभर दुसऱ्याची मर्जी सांभाळत पन्नाशी ओलांडल्यावर सासूचा सुनेशी सामना होतो तेंव्हा तिला तेवढीच एक जागा मिळते आपले अस्तित्व दाखवण्यासाठी. त्यातून अनेकदा स्त्रिया इतर स्त्रियांवर सत्ता गाजवताना दिसतात. आपण कुणावर तरी सत्ता गाजवायची असते हे मूल्यच मुळात पुरुषी, सरंजामी  आणि लोकशाहीविरोधी आहे.’