नवरा मारतो तर प्रेमही करतोच की.

असल्या प्रेमापारीस नसलेला बरा..


मारणे ही केवळ शारीरिक हिंसा नाही, तर तितकीच मानसिक हिंसा आहे. जवळच्या नात्यात होणारी हिंसा ही विषम नातेसंबंधांचेही प्रतीक असते. अशी हिंसा मालक कोण आहे, किवा सत्ता कोणाकडे आहे हे दाखवून देते. उदा. पालक मुलांवर हात उचलतात, नवरा बायकोवर हात टाकतो. सहसा अशा नात्यांमध्ये उलट होताना दिसत नाही. अशा हिंसेला सामाजिक समर्थनही खूप असतं. नवऱ्याने मारलं आणि पावसानं झोडपलं तर दाद कोणाकडे मागणार? अशी एक भयंकर वास्तव सांगणारी आणि आपल्या पुरुषी समाजाच्या थोतांड नैतिक परंपरांची पोलखोल करणारी म्हण तुम्हाला माहितच असेल. पती-पत्नीच्या विषम नात्याबद्दल यापेक्षा अधिक स्पष्टपणे काय बोलणार? अशा प्रकरच्या कुठल्याही हिंसेला कडाडून प्रतिकार करायला हवा. मारहाण, हिंसा ह्यात गुंजभरही प्रेम नाही.