आजकालच्या मुलींचे कपडे, फॅशन्स,वागणं बघा! कसे छेडछाड/बलात्कार होणार नाहीत मग!

नाही रं माज्या बाबा..

हा समज चुकीचा आहे. कारण अगदी पाळण्यातील मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत लैंगिक हिंसा होताना दिसून येते. खरं तर मुली-स्त्रिया यांच्या कपड्यावरून लैंगिक हिंसा होतच नाही. स्त्रियांनी समाजात घालून देलेल्या नियमानुसारच बोलले, वागले पाहिजे, त्यांनी असं केलं नाही तर पुरुष त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षा देतील. पुरुषांचा तो अधिकार आहे, हा समज खूप खोल आहे. आपल्या समाजात स्त्रीला माणूस म्हणून बघत नाही तर ती कोणाच्या तरी मालकीची वस्तू आहे असं समजतात. जोपर्यत स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघण्याचा आणि स्त्री-पुरुष समान आहेत असा दृष्टिकोन तयार होत नाही, तोपर्यंत ही लैंगिक हिंसा थांबणार नाही. तोपर्यंत अशी काहीही करणं देऊन ‘पुरुषी’ मंडळी आताच्या विषम व्यवस्थेची भलामण करत राहतील.