पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रीला सुरक्षित ठेवण्यासाठीच तयार केलं गेलं आहे.

“कुणापासून? मग तूच का नाही घेत नाकापत्तुर पदर!”

खरं तर ज्याच्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे, त्यालाच बुरख्यात किंवा घुंघटमध्ये ठेवलं तर.. उलट पदर किंवा बुरख्याच्या चिन्हामुळे लक्षात येईल की समोरून बुरखा बाबा येत आहे तर बाया मुली लगेच सावध होतील. काय वाटतं तुम्हाला? असो.

आपल्या समाजात स्त्रियांनी नेहमी कसं वागावं, कसं राहावं याबद्दल खूप बंधनं आहेत. स्त्रियांना बऱ्याच वेळा सुरक्षित ठेवण्याच्या नावाखालीच बंधनांत ठेवलं जातं. तेवढी बंधनं पुरुषांना नाहीत. कारण आपला समाज पुरुषांना श्रेष्ठत्व देणारा/मानणारा आहे. त्यामुळे स्त्रियांवर वागण्याचे-बोलण्याचे नियम आहेत. म्हणूनच पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रीला सुरक्षित (सेफ) ठेवण्यासाठीच तयार केलं गेलं आहे असा समज पसरविला जातो.