समलिंगी जोडप्यांमध्ये हिंसा-बिंसा काही होत नाही.

हसरी कल्पना..

समलिंगी व्यक्ती ही माणसंच असतात. याच व्यवस्थेत त्यांची वाढ झालेली असते. सत्ता आणि संबंध यांची समज तीच असते, जी सर्वसामान्य समाजात असते. हिंसा आणि नियंत्रणाचा वापर या नात्यातही दिसतो. अधिकार गाजवणे, असुरक्षिता आणि त्यातून भांडण, हिंसा तिथेही होते. कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांवर होणारी हिंसा हे ते नातं समान नाही तर विषमतेच्या पायावर उभं आहे हेच दर्शवते. आपण सर्वानीच हिंसेविरोधी प्रतिकार करणं / बोलणं गरजेचे आहे.