बहुतेक अपंग व्यक्तींना लैंगिक संबंधांची इच्छा नसते.

हे कोण ठरवणार? तुम्ही?

चूक आहे. आपल्या समाजात अपंग व्यक्तीकडे एकतर सहानभूतीने पहिले जाते किंवा मग तिरस्काराने. त्यांच्याकडे माणूस म्हणून बघितले जात नाही. त्यामुळे त्यांच्या जगण्याच्या अनेक अधिकारांचे हनन सतत होत असते. लैंगिक अभिव्यक्तीचा अधिकार हा ही त्यातील एक. इतर व्यक्तींना जशा लैंगिक गरजा आहेत, तशा त्यांनाही लैंगिक गरजा आहेत याचा विचारच केला जात नाही. समाजात सर्वच व्यक्तींना लैंगिक गरजा आहेत/असतात हे आपण समजून घेतले पाहिजे.