फक्त मुलींचाच लैंगिक छळ होतो.

“इथे तरी मुलगा मुलगी भेद नको”

मुलगा आणि मुलगी या दोघांवरही अत्याचार होतात. आपल्याकडे मुलांचं आणि मुलींचं सामाजिकीकरण वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. कधी कधी मुलींना खूप सुरक्षित वातावरण मिळतं तर मुलांना ते तेवढं मिळत, नाही. तर कधी मुलींना अनेकदा लैंगिक अत्याचारांचा अधिक सामना करावा लागतो. मुलगे अनेकदा असा अत्याचार झाल्याचं कबूल करणं कमीपणाचं समजतात. पण मुलगी असो वा मुलगा कोणावरही अत्याचार होणं चुकीचं आहे. असं आपल्या इथे कुठेही घडत असेल किंवा घडणार असं दिसत असेल तर एक नागरिक म्हणून आपण ते थांबवलं पाहिजे, त्याविषयी बोललं पाहिजे आणि त्याची तक्रार केली पाहिजे.