चांगला कौन्सिलर तोच जो घर मोडू देणार नाही.

“काय करायचं ते मीच ठरवणार!”

आपल्या इथे कुटुंब व्यवस्थेला खूप महत्व आहे. ही व्यवस्था टिकण्यासाठी कुठलीही किंमत द्यावी लागली तरी ती कमीच आहे असा एक समज दृढ आहे (बहुतेक वेळेस ही किंमत बाईकडूनच वसूल केली जाते). घर/कुटुंब मोडणं हे खूप कमीपणाचं आणि लाजिरवाणी गोष्ट आहे असं समजलं जातं. त्यामुळे चांगला/ली कौन्सलर कोण तर कुटुंब वाचवणारा/वाचवणारी असा एक समज या क्षेत्रातही दृढ आहे. चांगला समुपदेशक घर मोडू देणार नाही असं समजलं जात. जणू काही समुपदेशक हा न्यायनिवाडा करणारी व्यक्तीच आहे असाही एक समज त्यातून बळावतो आणि या भूमिकेतूनच अनेकदा समुपदेशकही वागायला लागतात. खरं तर बाईने किंवा त्या जोडप्याने एकूण स्थिती समजावून घेऊन स्वतःच स्वतःचे निर्णय घेणं अपेक्षित असतं. समुपदेशकाने कसलाही न्यायनिवाडा करायचा नसतो किंवा तसा अविर्भावही आणायचं नसतो.