समलिंगी व्यक्ती नेहमी सेक्सचाच विचार करत असतात, त्यातून हिंसा होते.

“नाही हो..प्लीज..”

लैंगिक संबंध करावेसे वाटणे, जोडीदाराची ओढ असणे नैसर्गिक आहे. सर्वांच्याच बाबतीत. तुम्ही कधी आणि किती वेळा सेक्स करू शकता हे तुम्हाला अशा संबंधातून आनंद मिळतो का, तुमची भावनिक गुंतवणूक किती आहे आणि स्वतःला सुरक्षित वाटते का अशा अनेक गोष्टीवर अवलंबून असते. समलिंगी किंवा विषमलिंगी असण्यावर नाही.

समलिंगी व्यक्ती सर्वसामान्य माणूसच आहेत. सर्वांप्रमाणेच ते ही आपले नॉर्मल आयुष्य जगतात. त्यांचेही तेच संघर्ष आहेत जे स्वतःला विषमलिंगी म्हणवणाऱ्या लोकांचे आहेत. किंवा ते अधिकच आहेत असे म्हणू या. समाजाकडून दाखवला जाणारा नकार झेलत, त्याचा सामना करत, विविध कुचंबना सहन करत आपले दैनंदिन जीवन त्यांना जगावे लागते. त्यामुळे समलिंगी व्यक्ती नेहमी सेक्सचाच विचार करतात हा गैरसमज काढून टाका.