मानसिक आजार म्हणजे पूर्व जन्मीचं संचित किंवा कुणाची तरी वाईट नजर.

ताप, सर्दी, खोकला अशा शरीराच्या आजारांप्रमाणेच मनाचेही काही आजार असतात.

मानसिक आजारांचा आणि पूर्व जन्म, पाप पुण्य अथवा नजर अशा कुठल्याही अवैज्ञानिक कल्पनांचा काही एक संबंध नाही. विज्ञानाच्याआधारे आजपर्यंत माणसाने आपले शरीर, त्यातील अनेक प्रक्रिया, शरीरच्या कामकाजातील बिघाड आणि उपचार अशा अनेक विषयात चौफेर प्रगती केली आहे. शरीराप्रमाणेच माणसाच्या मनाच्या आरोग्याच्या दिशेनेही मानवाने अनेक पावलं टाकली आहेत. माणसाचं शरीर जसं आजारी पडत तसं अनेक कारणांमुळे माणसाचं मनही आजारी पडू शकतो. शरीराच्या आजारांवर जसा उपचार केला जातो तसा मनाच्या आजारावरही उपचार आहे. मनाच्या आजाराचेही डॉक्टर आहेत त्यांना मानसोपचारतज्ज्ञ असे म्हणतात. शरीराचे उपचार घेतल्यानंतर जसे आजार बरे होतात तसे उपचारानंतर मनाचेही बहुतेक आजार बरे होतात किंवा नियंत्रणात ठेवता येतात. मानसिक आजारांच्या भोवती असलेले गूढत्व आणि गैरसमज दूर करून आजारी व्यक्ती आणि त्यांचे जवळचे लोक यांना आधार देण्याची खरी आवश्यकता आहे.

मानसिक आजार हा ही सामान्य आजार आहे.