पती पत्नीच्या नात्यात बलात्कार होत नसतो.

असं समाजाला वाटत असतं

लग्नाच्या नात्यात बलात्कार होत नसतात किंवा पती आपल्या पत्नीवर लैंगिक बळजबरी करू शकत नाही हा चुकीचा समज आहे. आपल्या समाजात मुलीचं लग्न झालं की ती तिच्या नवऱ्याची मालकी हक्काची वस्तू आहे असंच समजतात. यातूनच मुली/स्त्रिया यांच्यावर सर्रास हिंसा होताना दिसून येते. त्यामध्ये लैंगिक हिंसाही होत असते. पण तो स्त्रीचा नवरा असल्यामुळे त्या कोणाशी बोलू शकत नाहीत आणि समाजही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. आपला कायदा ही या बाबत स्पष्ट भूमिका आजही घेत नाही आणि लाग्नांतर्गत बलात्कारांना कायद्याने संरक्षण मिळत राहते. नवरा आहे त्याला इच्छा झाली की बाईने तयारच असायला हवं, नवऱ्याचा अधिकारच आहे तो अशा पद्धतीने आपल्याकडे लैंगिक नाते संबंधांकडे पाहिलं जातं. शिवाय बाईच्या लैंगिकतेला, तिच्या इच्छांना आणि तिच्या ‘नको’ ला पती आणि समाजाच्या लेखी सामान्यतः काहीच स्थान नसतं.
या उलट चांगल्या पुरुषांना ‘नको’ चा अर्थ कळतो. त्यामुळेच बायांनी आपला ‘नकार’ स्पष्टपणे समोरच्याला लक्षात आणून द्यायला हवा आणि कुठल्याही जबरदस्तीला विरोधच करायला हवा.
सहन करू नका, बोला