लिंगभेदाचे बीज

कळत-नकळत आत्मसात केलेली पितृसत्ता: आपल्या मनात खोलवर रुजलेले लिंगभेदाचे बीज

बाळा, ही अतिशय लाजिरवाणी आणि शरमेची गोष्ट आहे; कोणालाही सांगू नको बरं का!” लैंगिक शोषणास सामोरे गेलेल्या चार वर्षांच्या मुलीला तिची आई सांगते

“त्या मुलीचे पूर्वी अनेकांसोबत संबंध होते म्हणून आम्हाला हे स्थळ मान्य नाही ”; नवऱ्या मुलाची आई म्हणते

“तू जर मॉडेलिंगमध्ये गेलीस तर तुझ्याशी लग्न कोण करणार?” एका सुपर मॉडेलची आई

“माझ्या नवऱ्याने माझ्या चुलत बहिणीची छेड काढली, हे मला माहित आहे; पण काही झालं तरी तो माझा नवरा आहे; मी त्याच्याविरुध्द जाऊ शकत नाही” एका पत्नी

एक वधू म्हणते, “ मी मला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करत आहे. त्याच्या कुटुंबाला हुंडा हवा असेल तरीदेखील माझी लग्नाला हरकत नाही ”.

अशा प्रकारचे संभाषण आपण नेहमीच ऐकतो. अशी वाक्ये ही एखाद्या स्त्री द्वेष्ट्या पुरुषाची नसतात तर इथे महिला पितृसत्तेच्या एजंट म्हणून काम करतात. खरेतर, माझ्या मते, या महिला चुकीच्या नाहीतच.

जे घडले आहे किंवा जे घडत आहे ते चुकीचे आहे, हे त्यांना माहित असते. परंतु त्यांनी हे सर्व त्यांच्या कळत-नकळत आत्मसात केलेले आहे. आपल्याला अनेकदा एखादा ड्रेस आवडतो, आपल्यावर तो छानही दिसतो पण आपण स्वतःहून तो ड्रेस बाहेर न घालण्याचे ठरवतो. समाज मान्यतेची भीती आपल्याला तसे करण्यापासून रोखते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पितृसत्तेची देखील हीच स्थिती आहे. आपण सार्वजनिक जीवनात हळूहळू समानतेकडे वाटचाल करत आहोत, हे खरे आहे पण चार भिंतींच्या आतल्या पितृसत्तेचे काय? आपल्या मनात एखाद्या अविनाशी वृक्षासारख्या रुजलेल्या पितृसत्तेच्या बीजांचे काय? यांसारख्या घटना या इतक्या सहज आणि सामान्य झाल्या आहेत, की या घटना म्हणजे जणू आपल्याला बांधून ठेवणारे साखळदंडच आहेत, हे आपल्या लक्षातही येत नाही.

आपण सार्वजनिक जीवनात हळूहळू समानतेकडे वाटचाल करत आहोत हे खरे आहे पण चार भिंतींच्या आतल्या पितृसत्तेचे काय?

आपण सार्वजनिक जीवनात हळूहळू समानतेकडे वाटचाल करत आहोत हे खरे आहे पण चार भिंतींच्या आतल्या पितृसत्तेचे काय?
महिलांमध्ये पितृसत्ता इतक्या खोलवर रुजली आहे, की त्यांना आपल्या दृष्टिकोनात काहीतरी चुकीचे आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. स्त्रीच्या आयुष्यात नक्की कुठे आणि कशारितीने पितृसत्तेची ही बीजे पेरली जातात हे थोडक्यात पाहू यात.

१. लहान असताना

जवळजवळ प्रत्येक आजी आपल्याला सीतेची गोष्ट सांगते. एक आदर्श पत्नी जिने स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी चितेमध्ये उडी घेतली. स्त्री पवित्र असलीच पाहिजे. तिने तिच्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीत साथ दिलीच पाहिजे. तिला जेव्हा खेळभांडी आणून दिली जातात तेव्हा दुसरी गोष्ट सुरु होते. तिला शेवटी स्वयंपाक करायला शिकलेच पाहिजे. ‘खेळ भांडी’, ‘घर-घर’ किंवा एखाद्या शिक्षेकेचे अनुकरण यांसारखे खेळ तिच्यासाठी निवडले जातात. शिक्षिकी पेक्षा हा महिलांसाठीचा पेशा आहे. तो तिच्यासाठी सुरक्षित आहे. ती घराच्या आतच खेळू शकते. खरेतर इथेच ही बीजे रोवली जातात. हे सगळे डोक्यात घेऊनच ती दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करते.

२. वयात येताना

‘लाज’ ही तिची ओळख बनते. तिला स्कर्टवर पडलेल्या डागाची लाज वाटली पाहिजे, तसेच मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना या ‘लज्जास्पद वेदना’ असल्याने तिने त्या लपविल्या पाहिजेत तसेच हे सगळे ती फक्त इतर स्त्रियांनाच सांगू शकते, असे तिची आईच तिला शिकवते. सॅनिटरी नॅपकिन्स वर्तमानपत्रात किंवा काळ्या पिशवीत गुंडाळणे गरजेचे नाही हे आपल्या सर्वांना माहितच आहे. मासिक पाळी येणे हे अगदी सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. पण आपल्यापैकी कितीजण मेडिकलवाल्याला असे करण्यापासून थांबवतात? आपल्या आया जेव्हा मासिक पाळीच्या काळात मंदिरात जाण्यापासून रोखतात तेव्हा आपण फक्त आपल्या आयांनाच प्रश्न विचारतो का? अशाप्रकारे आपणही पितृसत्ता आत्मसात करतो.

३. स्वप्नांचे वय

स्त्रियांच्या हक्कांच्या मान्यतेसाठी भारत एक एक पाऊल पुढे टाकत आहे. “लग्नानंतर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय करण्यास सासरच्यांची परवानगी आहे का?” हा प्रश्न आजही उद्भवतो. हा प्रश्न दुहेरी आहे. जो हा प्रश्न विचारतो आणि ज्याने हा प्रश्न विचारला आहे दोघांनीही पितृसत्ता आत्मसात केलेली असते. हे झाले नंतरचे, पण मुळात एखाद्या बाईला हा प्रश्न विचारला जातो हेच अडचणीचे आहे. विशेष म्हणजे, शहरी भागातील स्त्रियांना लग्नानंतर नोकरी करण्यास मनाई आहे तर ग्रामीण स्त्रिया मात्र काम करू शकतात. आणि होय, याचे उत्तर आहे ती गरीब लोकांची गरज आहे. हे अगदी खरे! पण स्वतःची भाकरी मिळविणे आणि स्वावलंबी होणे ही प्रत्येक व्यक्तीचीच गरज नाही का? एखाद्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करणे किंवा तिथपर्यंत पोहोचणे हे केवळ आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी केले जात नाही, हे समजण्यात शहरी भाग अयशस्वी झाले. खरेतर स्त्री, पुरुष याची पर्वा न करता हे एकप्रकारे स्वतःची स्वतंत्र ओळख बनविणेच आहे. नोकरी करणाऱ्या अनेक महिलांवर अति-महत्वाकांक्षी असल्याचा आरोप केला जातो. बऱ्याचदा मूल झाल्यानंतर त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले जाते किंवा व्यावसायिक जीवन, नोकरी सोडण्यास सांगितले जाते. खरेतर ही तिने त्या काळात केलेली स्वतःहून केलेली निवड नसते, तर ते एकप्रकारची सक्तीच आहे. पण ही सक्ती निवडीच्या पडद्याआड झाकली जाते – थोडक्यात काय, तर आत्मसात केलेल्या पितृसत्तेचा परिणाम.

स्त्रियांच्या बाबतीत व्यवसाय आणि लिंगभाव यांचा संबंध जोडला जातो आणि अशा प्रकारे आत्मसात केली गेलेली असमानता समोर येते. आजही आपण जेव्हा ‘यांत्रिकी’ अभियांत्रिकी, खाणकाम, सैन्य, व्यापारी, नौसेना इ. व्यावसायिक करियर निवडणाऱ्या स्त्रिया पाहातो तेव्हा भुवया उंचावल्या जातात. स्त्रिया त्यांच्या कर्तृत्वाची, पराक्रमाची चाचणी घेण्याआधीच त्या शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत असे समजले जाते. वर नमूद केलेल्या व्यावसायिक कारकीर्दीत पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. ही गोष्ट पुरुषांना देखील लागू होते. आजही शाळा व महाविद्यालयांमध्ये शिकविणारे पुरुष, फॅशन डिझायनिंग किंवा स्वयंपाक क्षेत्रामध्ये असणाऱ्या पुरुषांची कमतरता दिसून येते. अशा पुरुषांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एखाद्या एम.बी.ए. किंवा इंजिनीअर प्रमाणेच संघर्ष करावा लागतो. स्त्रियांना गाडी चालविता येत नाही, त्या वाईट ड्रायव्हर्स असतात आणि पुरुष स्वयंपाकासाठी योग्य नाहीत असे चित्रण करणारे विनोद अद्यापही प्रचलित आहेत. आपण हे इतक्या सहजतेने स्वीकारले आहे, की आपले मन आपल्या रोजच्या जीवनात आणि निवडींमध्ये असलेल्या या छोट्या छोट्या भेदभावाकडे आपोआपच दुर्लक्ष करते.

४. लग्न म्हणजे काहीतरी गंभीर

भारतात ‘लग्न’ या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होत आहे असा आपण कधी विचार केला आहे का? बहुतेक स्त्रिया या शब्दापासून पळ काढताना दिसतात. याला कारण केवळ लग्न ही एक जबाबदारी किंवा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे हे नसून, खरे कारण म्हणजे आपल्या मनात रुजलेल्या लग्नाविषयीच्या धारणा. “परक्याचे धन” ही संकल्पना असेल किंवा ‘लग्न हा एक असा रस्ता आहे जिथून स्त्रिया घरी परत येऊ शकत नाहीत’, ही कल्पना; किंवा ‘मुलगी ही ओझे आहे आणि ते दुसर्याा कोणाला दिले जाते’, ही संकल्पना असेल. भारत प्रगती करीत आहे हे खरे आहे, पण अजूनही कुठेतरी अगदी सुशिक्षित शहरी कुटुंब देखील “तू लग्न करत नाहीत म्हणजे काय? तू असे कसे काय करू शकतेस.? तू आमची एकुलती एक मुलगी आहेस, आमची जबाबदारी आहेस.” किंवा “तुझे वडील निवृत्त होण्याआधीच लग्न करा म्हणजे आम्ही आमच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊ ” अशी वाक्ये ऐकायला मिळतात.
कुमारी माता झाल्यास होणारा अस्वीकार आणि लग्नानंतर आई व्हायचे की नाही हे निवडीचे स्वातंत्र्य नसणे याची भीती प्रत्येक भारतीय स्त्रीला त्रास देते.

भारतात विवाहात ‘वय’ या गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. योग्य वयात लग्न झाले पाहिजे. ‘आय डू’ असे म्हणण्यासाठी तिला तरूण असणे आवश्यक असते. तिला तरुण दिसणारी पत्नी आणि दोष रहित तरुण आई असायला हवे. या पुन्हा स्त्रियांनी आत्मसात केलेल्या पुरुषप्रधानतेच्या निवडी आहेत. कोणत्याही स्त्रीला जर आपण, ‘ती आता घरी परत येऊ शकत नाही’ असे सांगितले नाही किंवा जर आपण ‘लग्न ही फक्त नवीन नात्याची सुरुवात आहे’ असे म्हटले असते किंवा आईवडिलांना सोडून जाताना मुलीने रडले पाहिजे अशी लोकांनी अपेक्षा ठेवली नाही, तर कदाचित कोणतीही भारतीय मुलगी लग्नामध्ये कधीही रडणार नाही.

५. आई होताना

भूमिका ओळखणे. मातृत्व एक अशी गोष्ट ज्याशिवाय स्त्री “अपूर्ण” आहे असे मानले जाते. मातृत्व. हे आत्मसात केलेल्या पितृसत्तेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. काळजी, चिंता, करुणा ही मानवी वैशिष्ट्ये आहेत. परंतु आपण मात्र बर्या्चदा त्यांना विशिष्ट लिंगाशी जोडतो.

लहानपणापासूनच स्त्रियांना बाहुल्या सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ‘आई होणे’ ही अशी लिंगभाव भूमिका आहे, ज्यात महिलांना अनुरुप भूमिकेसह संभ्रमित केले जाते. स्त्रियांकडे नैसर्गिकरित्या गर्भाशय आणि पुनरुत्पादक क्षमता आहे, हे खरे आहे परंतु याबाबतीतील त्यांची निवड अनेकदा नाकारली जाते. गर्भपात हा लोकसंख्येच्या बर्याुच भागांमध्ये निषिद्ध आहे आणि ते एकप्रकारचे ‘पाप’ आहे, असे मानले जाते.

कुमारी माता झाल्यास होणारा अस्वीकार आणि लग्नानंतर आई व्हायचे की नाही हे निवडीचे स्वातंत्र्य नसणे याची भीती प्रत्येक भारतीय स्त्रीला त्रास देते. आई होणे किंवा न होणे हा खरेतर प्रत्येक स्त्रीची जाणीवपूर्वक निवड आणि तिचा तो हक्क असायला हवा परंतु शेवटी ती स्वतःला असे विचारते, “मी खरेच असंवेदनशील आहे का? वांझोटी बाई अशी ओळख घेऊन मी समाजात कसे काय जगू शकेन? ” पुन्हा, आत्मसात केलेली पितृसत्ता.

मी महिलांना दोष देत नाही. पितृसत्ता आत्मसात करणे हा त्यांचा दोष नाही. त्याचा अनावश्यक, अवास्तव असा वारसा स्त्रिया पुढे घेऊन जात आहेत. पितृसत्ता आपल्यात केव्हा आणि कशी रुजते करते हे आपल्या लक्षातही येत नाही. आपण पितृसत्तेची बंधनं आपण आपल्या नकळत आपली स्वतःची निवड म्हणून स्वीकारतो. त्याच्या या छटा या आपल्याला होत असलेल्या जाणिवेपेक्षा अधिक गडद आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही.
यावर उपाय काय?

एलिस वॉकरने म्हंटल्यानुसार, स्वतःची फेमिनिस्ट नाही तरी किमान ‘वूमनिस्ट’ म्हणून जाणीव असायला हवी. आपण मनुष्य आहोत. आम्ही जन्मापासूनच लिंगभाव भूमिकांनी बांधलेले लोक म्हणून नाही तर एक माणूस म्हणून प्रश्न विचारत आहोत. आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की स्त्रीला एक समुदाय म्हणून पितृसत्तेविरूद्धच्या लढाईला सामोरे जावे लागेल ज्यामध्ये केवळ स्त्रीविषयीचा पूर्वग्रह नव्हे तर अनेक पुरुषप्रधान घटकांचा समावेश आहे.

संदर्भ – फेमिनिझमइंडीया.कॉम वेबसाईट