ज्येष्ठ व्यक्तींनी स्वतःची काळजी कशी घ्यावी?

  • ज्येष्ठ व्यक्तींनीही याबाबत योग्य ती काळजी सुरुवातीपासूनच घेतली पाहिजे. आर्थिक बाबतीत आपल्या अत्यंत विश्वासाच्या व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घेऊ  नयेत. तसेच जमल्यास अन्य दोघा-तिघांचा सल्लाही जरूर घ्यावा. खूप जास्त लाभाच्या मागे लागू नये. येणाऱ्या योजनेचा तारतम्याने विचार करावा.
  • घरातील व्यक्ती किंवा काळजीवाहक जे असतात त्यांच्याशी जुळवून घेणे ही एक मोठीच जबाबदारी ज्येष्ठांवर असते. सगळ्या गोष्टी आता आपल्या मनाप्रमाणे होणार नाहीत. प्रत्येक बाबतीत अतिआग्रही भूमिका घेणे योग्य नाही. तसेच प्रत्येक गोष्टीबाबत तक्रार करणेही योग्य नाही. त्याने हळूहळू आजूबाजूचे लोक योग्य त्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष करायला लागू शकतात.
  • घरात जेव्हा कोणी नोकर माणूस ठेवण्याची गरज पडते त्यावेळी त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. ती माहिती जवळच्या पोलीस स्टेशनवर देऊन ठेवली पाहिजे. त्याचे ओळखपत्र, फोटो कोणातरी नातेवाईकाकडेही देऊन ठेवली पाहिजे. घरकाम करणाऱ्या माणसांसमोर कपाटं वगैरे उघडून मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन करू नये. पैशाच्या गोष्टींबद्दल चर्चा करू नये.
  • ज्येष्ठ व्यक्तींनचा आपला असा एखादा ग्रुप असावा. आपण जिथे रहात असतो तिथल्या लोकांबरोबर सौहार्दाचे संबंध असावेत. ज्येष्ठ नागरीक संघांचे सदस्यत्व असेल तर त्याठिकाणी आपले सुहृद निर्माण होतातच. ह्या संघातल्या लोकांनी एकमेकांकडे येत जात राहिले पाहिजे. एकमेकांपाशी मन मोकळे केले पाहिजे. एखाद्या घरात जर घरातल्या व्यक्तीला वेळ नाही म्हणून बाहेरच्या नर्स किंवा आया यांची नियुक्ती केली असेल तर त्यांच्या वागण्यात कांही अयोग्य जाणवले तर लगेच घराच्या लोकांच्या ते कानावार घातले पाहिजे.
  • घरातल्या लोकांनीही ज्येष्ठ व्यक्तींचे म्हणणे नीट ऐकून घेऊन निरीक्षण करून आपले मत बनवले पाहिजे. ज्येष्ठ व्यक्ती हिंडते फिरते आहेत,  त्यांनी बाहेर जाताना उगाच दागिने घालू नये किंवा अपरात्री, अडचणीच्या ठिकाणी एकट्यानेच फिरू नये.
  • हल्ली अनेकदा घरातली तरुण पिढी परगावी किंवा परदेशी असते. अशावेळी ज्येष्ठ व्यक्तींनी घरात एकट्यानेच रहाण्यापेक्षा आपल्या सोयीच्या वृद्धनिवासाचा पर्यायसुध्दा स्वीकारायला हरकत नाही. एकट्याने रहाण्यापेक्षा अवतीभवती समवयस्क, समविचारी माणसे असली की वेळही चांगला जातो आणि सुरक्षितताही मिळते. अशा ठिकाणी जे व्यवस्थापक असतात त्यांची मदतही मिळते. ज्येष्ठ व्यक्तीही परस्परांची मदत जास्त चांगल्या पध्दतीने करू शकतात.
  • शेवटी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे सतर्क राहून. वेळेवर औषध घेणे, व्यायाम करणे याने शारीरिक स्वास्थ्य चांगेल राहते. निरनिराळे बौद्धिक खेळ खेळणे, कोडी सोडवणे, पुस्तके वाचणे, याने बुद्धीला-मेंदूला व्यायाम होऊन तोही ताजातवाना होतो.

लेखन – आरती पेंडसे – मानसतज्ज्ञ व समुपदेशक

ज्येष्ठ व्यक्तींसाठी अजून काही लेख वाचनासाठी दिले आहेत. खालील लिंकवर क्लिक करून लेख वाचता येतील.

a. वृद्धांचा खरा आधार बना…

http://www.esakal.com/muktapeeth/yunus-tamboli-write-article-muktapeeth-141910

b. पिढीतले अंतर कमी कसे होईल? -वृद्धकल्याणाची सुरुवात प्रथम स्वत: वृद्धापासून होते.

https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/what-is-generation-gap-1733396/

c. गरज कार्यक्षम, सक्षम ज्येष्ठांची- त्यामागे खूप महत्त्वाचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असा मोठा विचार होता.

https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/senior-citizens-challenges-for-senior-citizens-1725160/

d. वृद्धकल्याण राजकीय की सामाजिक प्रश्न?- घरातले संपले तर दुसऱ्याकडे मागावे, पण शक्य होत नसेल तरच दुसऱ्याची मदत घ्यावी.

https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/dr-rohini-patwardhan-article-on-senior-citizen-issues-1717182/

e. वृद्ध निवासाचे पर्याय- वाढत्या आयुष्यातला एक एक दिवस हा नवनवीन समस्या घेऊन येणार आहे.

https://www.loksatta.com/sanhita-sathottari-news/article-about-living-option-for-senior-citizen-1708860/

संदर्भ – लोकसत्ता – चतुरंग, लेखन – रोहिणी पटवर्धन – rohinipatwardhan@gmail.com