व्यसन हेच कौटुंबिक हिंसेला कारणीभूत ठरते

हिंसेला व्यसन कारणीभूत नसते परंतु व्यसनामुळे हिंसेच्या प्रमाणात वाढ नक्की होते.

प्रचंड दारू पिऊन आल्यावरही तो बाबा आपल्याच घरी जातो आणि सहसा आपल्याच पत्नीला छळतो, मारहाण करतो. वस्ती किंवा गावातील एखाद्या तालेवार व्यक्तीच्या घरी जात नाही हे कसं? दारू पिल्यामुळे काहीच काळत नाही असं म्हणतात तर आपल्या घराचा रस्ता कसा कळतो? हिंसेला कारण व्यसन नाही त्या नवऱ्याचे नवरा असणं कारणीभूत आहे. याला सत्ता संबंध म्हणतात.
कोणत्याही कारणामुळे हिंसेला पाठीशी घालू नये.