ती तसलीच आहे, मुद्दाम करते. नवरा मारणार नाही तर काय पूजा करणार का?

“म्या अशीच हाय”

पुरुषाच्या समर्थनार्थ ऐकायला मिळणारी ही वाक्य आहेत. आपल्या समाजात नवरा मालक, धनी असतो. पूजा (शब्दशः) नवऱ्याची होते. स्त्रीने पुरुषाला विरोध केला, तर ‘ही बघा नवऱ्याला कसं उलट बोलते, त्याचं ऐकत नाही’ असे म्हणतात. पुरुष चुकत असला तरी त्याचीच बाजू समाजातील इतर व्यक्ती घेतात. स्त्रियांनी नेहमी पुरुषाच्या बंधनातच राहिले पाहिजे. तिच्यावर त्याचा मालकी हक्क असतो. स्त्रीने स्वतः पुढाकार घेऊन काही केलं किंवा कामानिमित्त घराच्या बाहेर पडली तर आपल्या पुरुषी समाजव्यवस्थेच्या पचनी पडत नाही. उलट ‘त्या स्त्रीलाच नावं ठेवून तीच अशी वागली तर नवरा काय पूजा करेल का’? असं म्हणतात.