मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी हिंसा ओळखण्यासाठीची प्रश्नावली

फोन, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया आदि माध्यमांचा उपयोग करून मुलींना त्रास देणे, लैंगिक छळ करण्याचे अनेक प्रकार आपण नेहमी ऐकतो, पाहतो, अनुभवतो. खाली अशा काही प्रकारांची एक यादी देत आहोत. तुमच्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून असं केलं जातं का? तर ही हिंसा आहे हे लक्षात ठेवा.

  1. तुम्हाला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविले जातात का?
  2. तुम्हाला वॉट्स अॅपवरून अश्लील मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवले जातात का?
  3. वॉट्स अॅपसारख्या माध्यमातून तुमची इच्छा नसताना विनाकारण तुमच्याबरोबर चॅट करण्याचा प्रयत्न केला जातो का?
  4. फेसबुकवर असेलेल्या तुमच्या फोटोंचा गैरवापर केला गेला आहे का?
  5. फेसबुकवर तुमची इच्छा नसतानाही कोणी चॅट करून त्रास देतात का?
  6. तुमचे प्रोफाईल वापरून किंवा तुमची माहिती वापरून कोणी खोटे अकाउंट तयार केले आहे का?
  7. फेसबुकवर मैत्री करून कोणत्याही कारणासाठी फसवलं आहे का?
  8. फेसबुकवरील तुमच्या फोटोचा गैरवापर करून ब्लॅकमेल करत आहेत का?
  9. फेसबुकवर मैत्री करून नंतर प्रेमाचं खोटं नाटक करून तुम्हाला एकांतात बोलवून लैंगिक शोषण केले आहे का/ करत आहेत का?
  10. तुम्हाला मेलवरून अश्लील मेसेज, फोटो, व्हिडीओ, एम.एम.एस पाठवले जातात का?
  11. तुमच्या खाजगी गोष्टीचे तुम्हाला माहीत नसताना फोटो, व्हिडीओ किंवा एम.एम.एस करून त्यासाठी तुम्हाला ब्लॅकमेल करत आहेत का? किंवा सोशल मिडीयावर तुमचे फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या अपरोक्ष अपलोड केले गेले आहेत का?
  12. फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या अपरोक्ष अपलोड केले गील आहेत का?
  13. डेटिंग अॅपचा वापर करून तुम्हाला कोणी फसवलं आहे का?

वॉट्स अॅप, ईमेल, इंस्टाग्राम(Instagram), फेसबुक अशा माध्यमांचा गैरवापर करून मुलीं व महिलांना त्रास दिला जातो. त्यामुळे अशी माध्यंम वापरताना आपण सावध रहा, सुरक्षित रहा.

लेखन –  विद्या देशमुख