आपल्या मुलांबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे ओळखण्याबाबत, पालकांसाठी

पालक मित्रांनो, आपल्या मुलाबरोबर लैंगिक शोषण/हिंसा झाली आहे का? हे तुम्हाला खालील प्रश्नांवरून ओळखता येईल आणि आपल्या मुलांशी वर दिलेल्या मुद्द्यांच्या मदतीने बोलून नक्की काय झालं आहे हे माहित करून घेता येईल.

  1. तुमच्या मुलाच्या/मुलीच्या वागण्यात नेहमीपेक्षा खूप बदल जाणवत आहे का ज्यामुळे तुम्ही चिंतित आहात?
  2. तुमची मुलगी-मुलगा नेहमीसारखे वागत नसेल तर असे का वागत आहे?
  3. मूल कोणाशीच काही बोलत नसेल, एकटीचं बसून रहात असेल तर असं का होत आहे?
  4. मूल खूप घाबरलेलं, शांत-शांत दिसत असेल तर असं का होत आहे?
  5. मूल नेहमी ज्या गोष्टी करतं उदा. खेळणे, अभ्यास करणे, मित्रांसोबत बोलणे किंवा इतर अशा कोणत्याही गोष्टी करत नसेल तर असं का होत आहे?
  6. तिचे/त्याचे कशातच लक्ष लागत नसेल तर असं का?
  7. तिच्या- त्याच्या शरीरावर किंवा खाजगी अवयवांवर काही जखमा/खुणा दिसत असतील तर असं का?
  8. ती/तो स्वतःला एका खोलीत कोंडून घेत असेल तर असं का?
  9. कोणत्याच गोष्टीत मुलाला रस/आनंद/मज्जा वाटत नसेल तर असं का होत आहे?

याचा शोध घ्या. मुलांना दोष देऊ नका, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा.

लेखन –  विद्या देशमुख