बाल लैंगिक शोषण गरीब, अशिक्षित कुटुंबांमध्ये होतं.

चूक. बहुतेक वेळेस ‘सुशिक्षित, उच्च’ कुटुंबांमध्ये ते लपविलं/दाबलं जातं.

लैंगिकता हा मुद्दाच मुळी कुठे वाच्चता करण्याचा नाही असा आपल्या समाजाचा भाव आहे. त्यात इज्जत, इभ्रतीच्या खोट्या कल्पनांचाही मोठा प्रभाव आपल्या समाजमनावर आहे. बाललैंगिक शोषणाच्या बाबतही हेच घडते. आपल्या कुटुंबाच्या इज्जतीवर आक्षेप नको, पोलीस आणि कोर्टाच्या चकरा नकोत, समाजात त्याची चर्चा नको म्हणून कुटुंबात अशा शोषणाची कल्पना असूनही अनेकदा विरोध केला जात नाही. शोषण करणाऱ्या व्यक्ती विरोधात पावलं उचलली जात नाहीत. हे लपवण्यासाठी मुलांनाच गप्प बसवलं जातं, त्यांच्यावर अविश्वास दाखवला जातो. शोषण करणारी व्यक्ती जेवढी प्रतिष्ठित, कुटुंबात महत्वाची आणि सत्ता असणारी तेवढं शोषण आणि शोषित व्यक्ती मग ते मूल असेल नाही तर बाई बेदखल होणार. मुलांचे शोषण अशा प्रकारे जात, धर्म, वर्ग यांच्या रेषा मोडून अस्तित्त्वात असलेले आपल्याला आढळते. परंतु ज्या प्रमाणे तथाकथित ‘चांगल्या’ घरातील महिलांवरील हिंसा समोर येत नाही त्या प्रमाणेच मुलांचे शोषणही पुढे येत नाही.

बाललैंगिक शोषणाविरुद्ध जरूर बोला आणि तक्रार करा.