नियत्रण/बंधन घालणे

पुरुषप्रधानतेतून सत्ता स्थापन करणे. या सत्तेचा वापर करून व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे किवा व्यक्तीला बंधनात ठेवणे. यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसा दिसून येतात.

  • स्त्रीला घराबाहेर काम करण्यास मज्जाव
  • एकाकी पाडणे, सतत देखरेख ठेवणे
  • माहिती, पैसा, मालमत्ता, साधनसामुग्रीवर नियंत्रण ठेवणे
  • ती पैसा  मिळवत असेल, तर त्याचा स्वतः वापर करणे
  • स्वतःच्या पायावर उभे राहायला आडकाठी आणणे
  • तिच्याकडील दागिने, पैसे काढून घेणे
  • हुंड्यासाठी छळ
  • शिक्षण घेऊन न देणे.
  • मुली-स्त्रियांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे बोलायला, वागायला न मिळणे
  • सोशल माध्यमांचा गैरवापर करून मुलींना/स्त्रियांना फसविणे/ब्लॅकमेल करणे इत्यादी.
  • आर्थिक जबाबदारी आणि घरातील सर्वच जबाबदारी स्त्रियांवरच टाकणे
  • लग्न थाटामाटात करून देण्याची आणि मुलीला सोने घालण्याची मागणी करणे.

व इतर अनेक प्रकार