आर्थिक हिंसा

स्त्रियांना  आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र दिले  नसल्यामुळे ती आर्थिक बाबीसाठी ब-याच वेळा  दुस-यावर  अवलंबून आहे,  याची सतत जाणीव करून बंधनात ठेवणे/ त्रास देणे.  यामध्ये पुढील प्रकारच्या हिंसा दिसून येतात.

  • स्त्रीला पैसे कमावण्याचे स्वातंत्र्य नाही.
  • तिच्या नावावर घर, जमीन, मालमत्ता नसणे.(सासरी आणि माहेरी दोन्हीकडे सारखीच परिस्थिती)
  • तिने कमावलेल्या पैशांवर तिचा हक्क नसणे.
  • तिने कमावलेले पैसे काढून घेणे.
  • स्त्रियांना घर खर्चासाठी कमी पैसे देणे किंवा सतत हिशोब मागत राहणे.
  • कामाच्या ठिकाणी स्त्रियांना कमी वेतन व पुरुषांना जास्त वेतन असणे.