तुम्ही तुमच्या घरातच (कौटुंबिक हिंसा) हिंसेचा सामना करत असाल, तर…

हे जरूर करा

  • घाबरू नका, हिम्मत ठेवा.
  • विश्वासातल्या व्यक्तीशी बोला.
  • तात्काळ गरज असेल, तर हेल्पलाईनचा उपयोग करा.
  • आपल्याजवळ नेहमी महत्त्वाचे/आवश्यक संपर्क ठेवा.
  • महत्त्वाची कागदपत्रं आपल्याला पटकन मिळतील, किंवा घेऊन जाता येतील अशी ठेवा.
  • जर तुमच्या जीवाला धोका असेल तर तिथून सुरक्षित ठिकाणी जा.
  • हिंसेचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात त्यामुळे दवाखान्यात नक्की जा.
  • आपलं आयुष्य खूप मोलाचं आहे, हे लक्षात ठेवा.

हे कधीही करू नका

  • शांत बसू नका, सहन करू नका.
  • हिंसा होत असेल, तर विश्वासातल्या व्यक्तीपासून लपवू नका.
  • हिंसा करणाऱ्या व्यक्तीला तुमची सुरक्षित ठिकाणे सांगू नका / त्यांची माहिती होऊ देऊ नका.
  • स्वतःला इजा करून घेऊ नका.
  • स्वतःला दोषी मानू नका.
  • स्वतः चा जीव धोक्यात घालू नका

 

 

 

लेखन – विद्या देशमुख