तुम्ही छेडछाड अथवा लैंगिक हिंसा सहन करत असाल तर..

हे जरूर करा

  • तुमच्या सोबत छेडछाड / लैंगिक हिंसा होत असेल, तर त्या व्यक्तीला ठामपणे विरोध करा.
  • ती व्यक्ती तुमच्या सोबत जे काही करत आहे ते तुम्हाला आवडले नाही, हे तुमच्या बोलण्यातून-वागण्यातून त्या व्यक्तीला समजू द्या.
  • आरडा-ओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलवा आणि ती व्यक्ती तुमच्याबरोबर काय करते ते सांगा.
  • १०० नंबर डायल करून पोलिसांना तुमचं ठिकाण आणि तुमच्याबरोबर काय होत आहे हे सांगा.
  • आजूबाजूला कोणी नसेल तर तिथून लवकरात-लवकर सुरक्षित ठिकाणी जा.
  • तुमच्या विश्वासातल्या व्यक्तीला फोन करा.
  • सुरक्षित ठिकाणी आल्यानंतर हिंसा करणाऱ्या व्यक्तीची पोलिसांकडे तक्रार करा.
  • तुमच्यासोबत लैंगिक हिंसा/बलात्कार झाला असेल तर सर्वात प्रथम (सरकारी, खाजगी) दवाखान्यात जा, उपचार मिळावा, रिपोर्ट घ्या. नंतर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अवश्य करा
  • तुमच्या सोबत कोणत्याही प्रकारची लैंगिक हिंसा झाली, तरी तुमची त्यात काहीच चूक नाही हे नेहमी लक्षात ठेवा.

हे कधीही करू नका

  • तुमच्या सोबत छेडछाड / लैंगिक हिंसा  होत असेल तर घाबरू नका, गप्प बसू नका.
  • तुमच्याबरोबर जे काही घडलं आहे, ते विश्वासातल्या व्यक्ती अथवा पोलिसांपासून लपवू नका.
  • स्वतःला दोषी मानू नका.
  • स्वतःला त्रास करून घेऊ नका.
  • स्वतःला काही इजा करून घेऊ नका किंवा स्वतःचा जीव धोक्यात घालू नका.

 

 

 

 

 

 

 

 

लेखन –  विद्या देशमुख