तुमचा मोबाईल, इंटरनेट अथवा सोशल मीडियाचा वापर करून कोणी हिंसा करत असेल तर..

हे जरूर करा

  • हॉट्स अॅप, ,मेल अथवा फेसबुक अशा माध्यमांवर कोणी तुमची इच्छा नसताना चॅट करत असेल, तर त्या व्यक्तीला ब्लॉक करा.
  • अशा माध्यमातून कोणी तुम्हाला अश्लील संदेश, फोटो, व्हिडीओ पाठवत असेल तर सायबर क्राईम विभागात त्यांची तक्रार करा.
  • अशा व्यक्तींना आपल्या पेजवरून, संपर्क यादीतून काढून टाका. त्यांना ब्लॉक करा.
  • तुमचे एखाद्या व्यक्तीकडे खाजगी फोटो, व्हिडीओ असतील आणि त्यासाठी ती व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर विश्वासातल्या व्यक्तीला सांगा आणि  पोलिसात तक्रार करा.
  • आपल्या वैयक्तिक/खाजगी जीवनातील क्षणांचा दुरुपयोग होणार नाही यासाठी सावध असा. छुपे कॅमेरे लावून कोणी शूटिंग करणार नाही यासाठी सावधानता बाळगा.
  • आपला मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर कोणालाही देताना आपल्या वैयक्तिक/खाजगी माहिती लॉक करा अथवा माहिती दुसरीकडे ठेवा.
  • तुमच्यासोबत काहीही चुकीचं घडलंय/घडतंय असं लक्षात आल्यास ताबडतोब मदत घ्या, पोलिसात तक्रार करा.

हे कधीही करू नका

  • व्हॉट्स  अॅप / मेल / फेसबुकवर कोणी तुमची इच्छा नसताना चॅट करत असेल, तर  त्याच्याशी चॅट करू नका. / त्यांना रिप्लाय करू नका.
  • आपल्या कोणत्याही अकाऊंटचा पासवर्ड कोणालाही सांगू नका.
  • अपरिचित व्यक्तीला आपल्या अकाऊंट (फ्रेंड लिस्ट) शी जोडू नका.
  • आपला मोबाईल कोणालाही वापरायला देऊ नका.
  • तुमचे खाजगी फोटो, व्हिडिओ व्हॉट्स अॅप/मेलवर कोणत्याही व्यक्तीला (तुमच्या जवळचीही असली तरी.) सहसा पाठवू नका.
  • आपला आणि इतरांचा खाजगीपणा जपा. ऑनलाइन व्हिडिओ कॉलमध्ये कोणाही  व्यक्तीने (तुमच्या जवळची असली तरी.)
  • तुमचे खाजगी शरीर दाखवायला सांगितले, तरी तसे करू नका. (त्या चित्रांचा दुरुपयोग होऊ शकतो.)
  • तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली, तरी तुमच्यामधल्या खाजगी क्षणांचे तुमच्या नकळत किंवा तुम्हाला माहिती असतानाही  फोटो काढले जात असतील अथवा रेकॉर्ड केले जात असेल, तर तसे होऊ देऊ नका.
  • असं करणाऱ्या व्यक्तींना घाबरू नका आणि गप्पही बसू नका.

 

 

लेखन –  विद्या देशमुख