टोल फ्री हेल्पलाइन्स:

महिलांसाठी हेल्पलाईन - १८१     •     चाईल्ड हेल्पलाईन - १०९८     •     पोलीस हेल्पलाईन - १००     •     नॅशनल इमर्जन्सी हेल्पलाईन - ११२
 
                   

शासकीय योजना

शासकीय योजना

महाराष्ट्र राज्याच्या मुलींसाठी कल्याणकारी योजना

महाराष्ट्र राज्याच्या मुलींसाठी कल्याणकारी योजना ही पुस्तिका महिला व मुलींसाठी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या मुली / महिलांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पाठबळ पुरवणे हा या योजनांचा उद्देश आहे.

आय्एल्एस् विधी महाविद्यालय आणि स्विसएड ही सामाजिक संस्था “निर्धार समानतेचा” हा प्रकल्प राबवीत आहे. त्यासाठी युरोपीयन युनियनकडून अर्थसहाय्य लाभले आहे. मराठवाड्यात होणारी लिंग आधारित असमानता आणि त्यावर आधारित हिंसा थांबवण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत.

केंद्र शासनातर्फे तसेच राज्य शासनातर्फे अनेक प्रकारच्या योजना तळागाळातील लोकांना मदत व्हावी, त्यांना सहाय्य मिळावे आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने राबवल्या जातात. परंतु अशा प्रकारच्या योजनांची माहिती अनेक वेळा लोकांपर्यंत पोहोचत नाही. अशा योजनांची आवश्यक माहिती जर लोकांपर्यंत पोहोचली तर लोकांना त्याचा लाभ घेणे सहज शक्य होईल आणि शासनाला देखील त्या योजना राबविणे सोपे होईल. या उद्देशाने आम्ही मुली आणि महिलांकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती या संकेतस्थळावर देत आहोत. मुलींकरिता आणि महिलांकरिता लागू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती येथे दिली गेली आहे. प्रमुख शासकीय योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, लाभ आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मुलींना / महिलांना शिक्षण मिळाले, त्यांचे आरोग्य चांगले राहिले, त्यांना आर्थिक सहाय्य मिळाले तर आपोआपच त्यांचे सक्षमीकरण होण्यास मदत होऊ शकते.

या सर्व योजनांची माहिती गोळा करून ती माहिती योग्य रुपात आपल्या समोर आणण्याचे काम डॉ. स्वाती कुलकर्णी, डॉ. शैला डावरे आणि जेफी जेकब (सहाय्यक प्राध्यापिका,  आय्एल्एस् विधी महाविद्यालय, पुणे) यांनी केले आहे.

सर्व गरजू महिला व मुलींना ही माहिती वाचून त्याचा लाभ घ्यावा. तसेच, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आम्हाला खात्री आहे. या माहितीचा वापर करून जास्तीत जास्त मुली व महिलांनी शासनाच्या योजनांची लाभ घ्यावा.

वरील सर्व माहिती आपल्याला पुस्तिकेच्या रुपामध्ये डाऊनलोड करता येईल.